Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon crime: मासिक पाळीच्या कारणावरून सासरच्यांकडून छळ, गळफास घेऊन आत्महत्या; सासू-नणंदविरोधात गुन्हा दाखल

जळगाव मधून एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. मासिक पाळीत स्वयंपाक केला नाही म्हणून सासू आणि नणंदेकडून छळ झाल्याने एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 03, 2025 | 09:44 AM
crime (फोटो सौजन्य : social media )

crime (फोटो सौजन्य : social media )

Follow Us
Follow Us:

जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मासिक पाळीत स्वयंपाक केला नाही म्हणून सासू आणि नणंदेकडून छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली. राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील किनोद गावात ही घटना घडली आहे. महिलेचा संशयास्पद मृत्य झाल्याचा आरोप महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. महिलेच्या अंगावर खुणा आणि जखमा आढळून आल्या आल्याने महिलेच्या भावाने तिच्या सासू आणि नणंद यांच्यावर गळा दाबून खून केल्याचा आरोप केला आहे.

मित्राच्या वाढदिवसाची पार्टी बेतली जीवावर; जलतरण तलावात बुडून तरूणाचा मृत्यू

मृत महिलेचे नाव गायत्री कोळी असे आहे. गेल्या काही महिन्यांपासून महिलेच्या माहेरून पैश्याची मागणी केली जात होती. तसेच किरकोळ कारणांवरून तिला सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता असा आरोप केला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांनी केलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पैश्याच्या त्रासातून मानसिक त्रास दिला जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्या तपासात समोर आला आहे.

महिलेच्या मृत्यूचा प्रकार समोर आल्यानंतर विवाहितेच्या माहेरच्यांनी तडक किनोद येथे धाव घेतली. बहिणीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आल्याचे कळताच विवाहितेचा भाऊ आणि मावशी दोघांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला आहे. महिलेच्या अंगावर खुणा आणि जखमा आढळून आल्याने सासू आणि नणंद या दोघीनी गाला दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या भावाने आणि मावशीने केला आहे.

सासरच्यांकडून गायत्रीचा छळ

गायत्रीच्या भावाने म्हणजेच सागर कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून माहेरून पैसे आणण्यावरून सासरी गायत्रीचा छळ होत होता. किरकोळ कारणांवरून शिवीगाळ,मारहाण केली जात होती.मासिक पाळी असल्याने सासरचे लोक तिने केलेला स्वयंपाक ही खात नसल्याने आपल्या बहिणीने मासिक पाळी सुरू असल्याने स्वयंपाक केला नव्हता. या कारणावरून सासू आणि नणंद या दोघींनी बहिणीला शिवीगाळ करून मानसिक त्रास दिल्याने तसेच मारहाण केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप मृत विवाहितेच्या भावाने केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घटनेनंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मृत गायत्री कोळी हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

NAGPUR CRIME : नागपूर हादरलं! दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह रेल्वे स्थानकाजवळ आढळला; तीन संशयित ताब्यात; नेमकं काय घडलं?

Web Title: Tortured by in laws over menstruation commits suicide by hanging case registered against mother in law and daughter in law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 09:44 AM

Topics:  

  • crime
  • Crime . Crime News
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा
1

Nashik Crime: Snapchat वरून मैत्री, लग्नाचं आमिष अन् 18 वर्षीय तरुणीची फसवणूक; आरोपीविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा

Amravati Crime: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू
2

Amravati Crime: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Hyderabad Crime: ‘बाळाची DNA टेस्ट करा’ म्हणताच वाद; 5 महिन्यांच्या गरोदर पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पती-सासू अटकेत
3

Hyderabad Crime: ‘बाळाची DNA टेस्ट करा’ म्हणताच वाद; 5 महिन्यांच्या गरोदर पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पती-सासू अटकेत

Pune Crime: आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलाने संपवलं जीवन; पुण्यात माय-लेकांच्या मृत्यूने हळहळ
4

Pune Crime: आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलाने संपवलं जीवन; पुण्यात माय-लेकांच्या मृत्यूने हळहळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.