देव तारी त्याला...! 'माझ्या पोरांना सांभाळ' म्हणत तरुणाने घेतली नदीत उडी; पण...(File Photo : Drowned)
नागपूर : फार्महाऊसवर मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या युवकाचा जलतरण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. प्रांजल रावळे (वय 22, रा. चंद्रमणीनगर) असे मृताचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी रात्री तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल हा वडील आणि लहान भावासोबत राहत होता. तो वायफायचे काम करायचा. बुधवारी मित्र प्रशिक महेशकर (वय 28) याचा वाढदिवस असल्याने बाहेर फार्महाऊसवर पार्टी करण्याची त्यांनी योजना आखली. मंगळवारी रात्री एकूण 12 मित्र वाठोडा ठाण्यांतर्गत पांढुर्णा येथील गोल्डन व्हॅली फार्महाऊसवर पार्टीसाठी गेले. रात्री बाराच्या सुमारास सर्वांनी केक कापून जल्लोष केला.
पार्टीदरम्यान फार्महाऊसमधील जलतरण तलावात पोहण्याचा मोह प्रांजलला आवरला नाही. त्यानुसार, तो पाण्यात उतरला आणि पोहू लागला. पोहताना अचानक तो बुडू लागला. दरम्यान, प्रशिकचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्याने इतर मित्रांच्या सहाय्याने प्रांजलला बाहेर काढून उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती नाजूक असल्याने मेडिकल रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगण्यात आले. मेडिकलच्या डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी वैद्यकीय सूचनेवरून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मुलाच्या मृत्यूने रावळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मोरबे धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात थर्ड इअरमध्ये शिकणारा अनिकेत किसन भगत (वय 20) याचा मोरबे धरणात बुडून मृत्यू झाला. अनिकेत भगत हा सुकापूर, पनवेल येथील विद्यार्थी असून, बुधवारी परीक्षा संपल्यावर आणि एक मे पासून सुट्टी असल्याने मित्रांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरात आला. पोहण्यासाठी धरणात उतरला आणि नंतर बुडून त्याचा मृत्यू झाला.