इंदोरमध्ये भीषण दुर्घटना
संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवला
अनेक गाड्यांचे नुकसान
Truck Accident: मध्यप्रदेशमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये हा अपघात झाला आहे. एका ट्रकने असंख्य वाहनांना धडक दिली आहे. तर अनेक नागरिक देखील या अपघाताचे बळी ठरले आहेत. असंख्य जखमी झाले आहेत. घटना झाल्यावर संतप्त नागरिकांनी ट्रकच पेटवून दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
ब्रेकिंग…
इंदौर के एयरपोर्ट रोड स्थित शिक्षक नगर पर बड़ा हादसा। एक ट्रक ने 10-15 राहगीरों को कुचला। कई मौत।#indore #INDvsPAK #IndoreNews –#Indore pic.twitter.com/xjRyI8Ymhc
— Adv.surendra Alawa 𓃵 (@advsurendralawa) September 15, 2025
इंदोरमध्ये एका ट्रकने भीषण वेगाने येत अनेक वाहनांना धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की , त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. तर अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकला आग लावली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
इंदोर एअरपोर्टच्या परिसरात वेगाने येणारया ट्रकने 8 ते 10 वाहनांना धडक दिली आहे. तसेच अनेक लोकांना उडवले आहे. ट्रकचा वेग इतका भयानक होता की वाटेत येणारी प्रत्येक गोष्टीला त्याने उडवून लावले. थोड्या अंतरावर जाऊन मग हा ट्रक थांबला. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने ट्रकच पेटवून दिला. घटनेची माहिती मिळताच आरोग्यपथक, रुग्णवाहिका, पोलिस आणि अन्य यंत्रणा दाखल झाल्या. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
या भीषण अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याचे समोर येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत या घटनेचे भीषण रूप दिसून येत आहे. दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे. या घटनेत ट्रकच्या मालकाला आरोप केले जाण्याची शक्यता आहे. पोलिस पुढील तपास अत्यंत वेगाने करत आहेत.
रीलस्टार प्रतीक शिंदेचा अपघात
पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अपघातात तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांची हानी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा अपघात रिल स्टार म्हणून ओळखला जाणारा प्रतीक राम शिंदे (वय 24, रा. भादलवाडी, ता. इंदापूर) याच्या फॉर्च्युनर गाडीमुळे घडला असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील बाळासाहेब होले आपल्या क्रेटा गाडीतून महामार्गावरून जात होते. त्यावेळी प्रतीक शिंदेच्या फॉर्च्युनरने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, क्रेटा पुढे असलेल्या मारुती व्हॅगनरवर आदळली. परिणामी तीनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.