पुणे: पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अपघातात तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांची हानी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा अपघात रिल स्टार म्हणून ओळखला जाणारा प्रतीक राम शिंदे (वय 24, रा. भादलवाडी, ता. इंदापूर) याच्या फॉर्च्युनर गाडीमुळे घडला असल्याचे समोर आले आहे.
काय घडलं नेमकं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील बाळासाहेब होले आपल्या क्रेटा गाडीतून महामार्गावरून जात होते. त्यावेळी प्रतीक शिंदेच्या फॉर्च्युनरने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, क्रेटा पुढे असलेल्या मारुती व्हॅगनरवर आदळली. परिणामी तीनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
या अपघातामुळे वाहतूक कोंडी काही काळ निर्माण झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले आहे.
गुन्हा दाखल?
“लोकप्रियतेच्या नावाखाली काहीजण फिल्मी स्टाईलमध्ये गाड्या चालवतात. यामुळे सामान्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशा बेपर्वा वाहनचालकांवर कठोर कारवाई व्हायला हवी,” अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. भिगवण पोलिस ठाण्यात प्रतीक शिंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आणि इतरांच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. या अपघातामुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीसाठी शास्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी झालेल्या तरुणाचे नाव दिप्तिमान देवव्रत दत्ता (वय 33) असे आहे. तर आरोपीचे नाव शिवलिंग म्हात्रे (वय 25) असे आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत. या परिसरात अश्या अनेक घटना घडताना दिसत आहे.
का करण्यात आला हल्ला?
शिवलिंग म्हात्रेच्या मैत्रिणीने त्याच्याशी मैत्री तोडून दिप्तिमान देवव्रत दत्ता याच्यासोबत मैत्री केल्याने शिवलिंग चिडला आणि त्याने हा हल्ला केला. दिप्तिमान देवव्रत दत्ता मैत्रीणीला घेण्यासाठी थांबलेला असताना शिवलिंगने हा हल्ला केला. शिवलिंगला या हल्ल्यात मदत करणाऱ्या सिद्धार्थ गादिया आणि बालाजी मुंडे यांना अटक केली. शिवलिंग म्हात्रे हा फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. ही घटना पुण्यात येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोड येथे घडली आहे. तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर येरवडा खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे. या परिसरात अश्या घटना अनेकवेळा घडतांना पाहायला मिळत आहे.
Thane Crime: गणपती दर्शनासाठी गुजरातला गेलेला तरुण ठरला अपहरणाचा बळी; पाच दिवसांचा थरार संपला