
Kolhapur Accident : ऊसाने भरलेल्या ट्रकची वाहनांना जोरदार धडक; पाचजण गंभीर, वाहतूक ठप्प
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील मुख्य आणि गजबजलेल्या सायबर चौकात मंगळवारी (दि.10) रात्रीच्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात आलिशान मोटर गाड्या, टेम्पो, मिनी लक्झरी, लहान वाहने यांना धडक दिल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, या भीषण अपघातात जीवितहानी झाली नाही. यामध्ये पाच जण गंभीररित्या जखमी झाले. या चौकात रात्री उशिरापर्यंत वाहतूक बंद होती.
अपघातातील ट्रकचालक प्रदीप महादेव सुतार (रा. पट्टणकुडी), टेम्पो चालक अभिषेक माळी, दुचाकीचालक सुनील रेडेकर, दिलीप पटेल आदी जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास शाहू टोलनाक्याकडून भरधाव वेगाने आलेला व ऊसाने भरलेला ट्रॅक सायबर चौकात आला. राजाराम कॉलेजपासून घसरतीला आल्यावर या ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला. रात्रीची वेळ असल्याने या चौकात मोठी गर्दी असते. त्याचदरम्यान चौकातील सिग्नल सुरू असल्याने अनेकजण सिग्नल निघण्याची वाट पाहत होते.
याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने सायबर चौकात सिग्नलला थांबलेल्या गाड्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही कार आल्याने एकापाठोपाठ एक अशा सहा वाहनांना जोरांची धडक दिली. त्यानंतर हा ट्रक रस्ता दुभाजकावर जाऊन आदळला.
हेदेखील वाचा : Accident News: कुंभार्ली घाटात एसटी बस अन् रिक्षाचा भीषण अपघात; रिक्षात बसलेली महिला थेट…
दरम्यान, एकापाठोपाठ एक वाहनांना धडक देत हा ट्रक परत पुढे जाऊन एका मिनी बसला जाऊन धडकला. जोराची धडक बसल्याने ६ वाहनांचे नुकसान झाले. अपघातील वाहनांची स्पेअर पार्ट रस्त्यावर विखुरले होते. त्यामुळे सायबर चौकाकडे आलेल्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. हा अपघात झाल्याचे समजच नागरिकांनी घटना ठिकाणी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले.