Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime : निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! ‘कुटुंब नियोजन का केलं नाही?’वडिलांची दगडाने ठेचून हत्या

वडिलांनी दुसरं लग्न केलं म्हणून पोटच्या मुलाने वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 17, 2026 | 05:38 PM
निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! 'कुटुंब नियोजन का केलं नाही?'वडिलांची दगडाने ठेचून हत्या (फोटो सौजन्य-Gemini)

निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! 'कुटुंब नियोजन का केलं नाही?'वडिलांची दगडाने ठेचून हत्या (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Close
Follow Us:

धाराशिव : बाप आणि मुलाचं नातं हे प्रेम, आदर, मार्गदर्शन आणि आधार यावर आधारित एक खूप सुंदर आणि घट्ट नातं आहे. जिथे वडील मुलासाठी पहिला आदर्श (hero) आणि मार्गदर्शक असतात आणि मुलगा वडिलांना आपला मित्र आणि मार्गदर्शक मानतो, त्यांच्यातील हे नातं अनेकदा अबोल असूनही खूप भावनिक असते. हे नातं अनेक कथा, चित्रपट आणि कवितांमधून व्यक्त होतं. मात्र धाराशिवमधून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया न करता दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलानेच आपल्या सख्ख्या बापाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

माथेरानमध्ये चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून चोरी; व्यापारी दाम्पत्याला बांधून दागिने लंपास

धुळप्पा महिपती सुरवसे (रा. मानेवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे आरोपी मुलाचे नाव असून, त्याने शुक्रवारी१६ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ५:३०च्या सुमारास अणदुर शिवारातील चिकणी तांडा परिसरातील शेतात आपले वडील महिपती आंबाजी सुरवसे (४५ वर्षे, रा. मानेवाडी) यांचा दगड डोक्यात घालून जिवे ठार मारल्याचा आरोप आहे.

दुसरे लग्न केले होते. मात्र, त्याची पत्नी इराप्पा हिचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यात आले नव्हते. या कारणावरून वडील व मुलामध्ये वारंवार वाद होत होता. याच वादातून संतप्त झालेल्या आरोपीने शेतात वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मृताची आई लक्ष्मीबाई आंबाजी सुरवसे (७० वर्षे, रा. मानेवाडी) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

शेतात रक्ताचा सडा

गुरुवारी सायंकाळी महिपती सुरवसे हे अणदुर शिवारातील शेतात काम करत असताना आरोपी धुळप्पा त्या ठिकाणी पोहोचला. तिथे पुन्हा त्याच कारणावरून दोघांत कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात धुळप्पाने रागावरचा ताबा सोडला आणि जवळच असलेला एक मोठा दगड डोक्यात घातला. दरम्यान, याप्रकरणी सध्या नळदुर्ग पोलीस आरोपीचा शोध घेत असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. एका शुल्लक घरगुती वादातून ही हत्या झाल्याने मानेवाडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Blast News: हॉटेल जगदंबामध्ये सिलेंडरचा स्फोट अन्…; 5 जखमी कामगारांचा उपचारांदरम्यान मृत्यू

Web Title: Tuljapur manewadi crime son killed father family planning dispute naldurg police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • crime
  • police

संबंधित बातम्या

Pune Crime: मालकाच्या विश्वासाला तडा! पुण्यात कामगाराने सोन्याच्या दुकानातून १२ लाखांचं सोने पळवलं
1

Pune Crime: मालकाच्या विश्वासाला तडा! पुण्यात कामगाराने सोन्याच्या दुकानातून १२ लाखांचं सोने पळवलं

Goa Crime: गोव्यात दोन रशियन महिलांची निघृण हत्या; हात-पाय बांधून गळा चिरलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह
2

Goa Crime: गोव्यात दोन रशियन महिलांची निघृण हत्या; हात-पाय बांधून गळा चिरलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

Uttarpradesh Crime: दुहेरी हत्याकांड! वहिनी व तिच्या प्रियकराची गळा चिरून हत्या, बहिणीवरही हल्ला; नंतर पोलीस ठाण्यात…
3

Uttarpradesh Crime: दुहेरी हत्याकांड! वहिनी व तिच्या प्रियकराची गळा चिरून हत्या, बहिणीवरही हल्ला; नंतर पोलीस ठाण्यात…

Parbhani Crime: दिवाळीच्या रात्री वृद्ध दांपत्याची लूट अन् तरुणाचा खून; आरोपी अखेर गजाआड
4

Parbhani Crime: दिवाळीच्या रात्री वृद्ध दांपत्याची लूट अन् तरुणाचा खून; आरोपी अखेर गजाआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.