Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MD Drugs Case: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदारालाच अटक! प्रकाश पवारसह दोघांना बेड्या; ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त

MD Drugs Case: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश पवार आणि त्यांचा साथीदार अखिलेश कुमार यांना अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अटक केली आहे. या कारवाईत ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्ससह एकूण १ लाख ३२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 19, 2026 | 12:04 PM
एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदारालाच अटक! प्रकाश पवारसह दोघांना बेड्या; ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त

एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदारालाच अटक! प्रकाश पवारसह दोघांना बेड्या; ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त

Follow Us
Follow Us:
  • एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश पवार यांना अटक
  • साथीदार अखिलेश कुमारलाही अंमली पदार्थ विरोधी कक्षाने घेतले ताब्यात
  • ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्ससह १ लाख ३२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
विजय काते, मिरा- भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाई सुरू असतानाच, पोलीस दलातील एका हवालदारालाच एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस हवालदार प्रकाश पवार आणि त्यांचा कथित साथीदार अखिलेश कुमार यांच्याकडून एमडी ड्रग्स, रोख रक्कम, दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस आयुक्त अनिकेत कौशिक यांनी मिरा-भाईंदर अंमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला असताना, पोलिसांच्याच कर्मचाऱ्यावर अंमली पदार्थ विक्रीचा आरोप झाल्याने या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. (MD Drugs Case)

साथीदार अखिलेश कुमार यालाही अटक

मिरा-भाईंदर शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीचा प्रश्न गंभीर बनलेला असताना, त्याविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यावरच एमडी ड्रग्स विक्रीचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस हवालदार प्रकाश पवार यांना अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अटक केली असून, त्यांचा कथित साथीदार अखिलेश कुमार यालाही अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन पाटील आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते. भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट परिसरात, गॅस गोडाऊनच्या गल्लीत हनुमान मंदिराजवळ सापळा रचून पवार यांना ताब्यात घेण्यात आले.

Mumbai: विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून वाद पेटला; नाना पाटेकर की स्मित मच्छार? नावाच्या मागणीवरून संघर्ष

नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या कारवाईत ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्स, एक बर्गमन दुचाकी, रोख १० हजार रुपये आणि दोन मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पवार हे २०१० पासून पोलीस सेवेत असून, त्यांनी यापूर्वी मिरारोड पोलीस ठाण्यात काम केले होते. अलीकडेच त्यांची कनकिया पोलीस ठाण्यातून पोलीस मुख्यालयात बदली झाली होती. दरम्यान, मिरा-भाईंदर शहर अंमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प पोलीस आयुक्त अनिकेत कौशिक यांनी व्यक्त केला असताना, पोलिसांच्याच कर्मचाऱ्यावर अंमली पदार्थ विक्रीचा आरोप झाल्याने या मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

शेतात अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना

शहरात अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केवळ विक्रेत्यांवर कारवाई करून पुरेसे ठरणार नाही, तर या व्यवहारामागील पुरवठादार, ग्राहकांपर्यंत पोहोचणारी साखळी आणि संभाव्य सहकारी यांचाही तपास होणे आवश्यक आहे. यापूर्वी नयानगर पोलीस ठाण्याशी संबंधित एका कर्मचाऱ्याच्या शेतात अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना आढळल्याचे प्रकरणही चर्चेत आले होते. त्यामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर प्रभावी देखरेख, तक्रारींची निष्पक्ष चौकशी आणि अंमली पदार्थविरोधी मोहिमेची परिणामकारकता याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर धायगुडे करीत असून, अंमली पदार्थांच्या व्यवहारामागील संपूर्ण साखळी उघड होते का, याकडे लक्ष लागले आहे.

Yavatmal News: कापसाने गाठला ९,६०० रुपयांचा भाव! कापसाचे दर वधारले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पादन घटले

💡

Frequently Asked Questions

  • Que: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे?

    Ans: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश पवार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत अखिलेश कुमार यालाही अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ताब्यात घेतले आहे.

  • Que: आरोपींकडून किती एमडी ड्रग्स आणि किती किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला?

    Ans: या कारवाईत ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्ससह एकूण १ लाख ३२ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • Que: प्रकाश पवार आणि अखिलेश कुमार यांना न्यायालयाने किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली?

    Ans: न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा कोठून होत होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास होणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Police constable prakash pawar arrested in md drugs selling case two accused in police custody sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Drugs
  • maharashtra
  • police

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: दुष्काळाची भीषण कुऱ्हाड! ‘आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा’; अश्रू ढाळत शेतकरी सोडतायत गोवंश
1

Maharashtra Drought 2026: दुष्काळाची भीषण कुऱ्हाड! ‘आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा’; अश्रू ढाळत शेतकरी सोडतायत गोवंश

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई
2

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार
3

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार
4

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.