Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी मोक्का मग घरफोडी; जेलमधील ओळखीतून पुन्हा गुन्हेगारी, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे पोलिसांनी झोमॅटो डिलीव्हरी बॉयचे कपडे घालून घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. मोक्का अंतर्गत जेलमध्ये असलेल्या गुन्हेगारांनी जामीनावर सुटल्यावर घरफोडी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 15, 2025 | 04:57 PM
Two criminals in Mcoca Act jail break house dressed as Zomato delivery boys in pune

Two criminals in Mcoca Act jail break house dressed as Zomato delivery boys in pune

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यामध्ये झोमॅटो डिलीव्हरी बॉयचे कपडे घालून घरफोडी करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश केला आहे. कुख्यात गँगस्टर टोळीच्या सदस्याची व कुविख्यात गुन्हेगाराची महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई होऊन कारागृहात रवाणगी झाली होती.  यानंतर कारागृहामध्ये दोघांची ओळख झाली. तब्बल ५ ते ६ वर्षांनी जामीनावर दोघेही कारागृहाबाहेर आले अन् ओळखीनंतर एकाने झोमॅटो डिलीव्हरी बॉयचे कपडे घालून शहरभर रेखीकरून घरफोड्या करत कोट्यवधींची माया जमविल्याचा धक्कादायक प्रकार स्वारगेट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. एकाने घरफोड्या केल्या आणि दुसऱ्या यातील सोन्याचे व हिऱ्याचे दागिने एका त्रयस्त गुन्हेगाराच्या मदतीने सरफाना विक्री केल्याचेही या तपासातून समोर आले आहे. स्वारगेट पोलिसांनी ३ कुख्यात गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून १४ घरफोड्यांमधील तब्बल १ कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे. सोबतच दोन पिस्तूल देखील जप्त केले आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

गणेश मारूती काठेवाडे (रा. मुखेड. जि. नांदेड), सुरेश बबन पवार (वय ३६, रा. अंबरवेड, गवळीवाडा, ता. मुळशी) आणि भिमसिंग उर्फ अजय करणसिंग राजपूत (नथवाला) (रा. राजस्थान, सध्या सांगवी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे, सहाय्यक निरीक्षक राहुल कोलंबिकर, उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, श्रीधर पाटील, कुंदन शिंदे, सुधीर इंगळे, शंकर संपते, सागर केकाण, रफिक नदाफ, राहुल तांबे व त्यांच्या पथकाने केली आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

स्वारगेट पोलिसांनी एकूण १४ घरफोडीचे तसेच स्वारगेट एसटी स्टॅण्डमधील ७ चोरीचे गुन्हे उघडकीस आणत ८६ तोळे सोने, १५० हिरे, साडे तिन किलो चांदी, २ पिस्तूल, ५ जिवंत राऊंड, १ दुचाकी, झोमॅटोचा ड्रेस व पिशवी यासह ८० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, सॅलेसबरी पार्कमध्ये घरफोडी झाली होती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पथकाला गणेश काठेवाडेबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने गणेशला उंड्री येथून पकडले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने घरफोडी केल्याची कबूली दिली. गणेशचे रेकॉर्ड तपासले असता त्याच्यावर तो कुविख्यात गुन्हेगार असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने स्वारगेटमधील ६, कात्रज येथील दोन तसेच बिबवेवाडी, सिंहगड रोड, मुंढवा, कोंढवा, वानवडी व खडकमधील प्रत्येकी एक घर फोडल्याचे समोर आले.
गणेशने घरफोडीमधून चोरलेले दागिने सुरेश याच्याकडे दिले होते. सुरेशने हे दागिने भिमसिंग राजपूत याच्या मध्यस्थीने चार सराफाना विकले होते. पोलिसांनी या सराफांकडे देखील चौकशी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानूसार पथकाने वेगवेगळ्या ठिकाणावरून गुन्ह्यांतील ऐवज दप्त केला.

१७०० सीसीटीव्ही तपासले

गणेश काठेवाडे सराईत चोरटा आहे. त्यामुळे पोलिसांना गुंगारा देण्यात तो पटाईत आहे. घटनास्थळी जाताना व चोरीकरून परत येताना तो गल्ली बोळाचा मार्ग निवडत होता. तो वेगवेगळे कपडे घालत असत. एखाद्या गल्लीत तो वरचा शर्ट काढून टाकून देत असत. तसेच, सीसीटीव्ही आहे, अशा ठिकाणी मुद्दाम मोबाईलवर बोलत असल्याचे भासवत असत. त्याच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल १७०० सीसीटीव्ही तपासले.

Web Title: Two criminals in mcoca act jail break house dressed as zomato delivery boys in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 04:57 PM

Topics:  

  • crime news
  • Pune

संबंधित बातम्या

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस
1

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
2

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान
3

मुसळधार पावसात नदीकाठी अडकली महिला; पोलीस, वन्यजीव रक्षक व मावळ संस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मिळाले जीवनदान

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे
4

आश्रमशाळेतील विद्यार्थीच निघाले मोबाईल चोर; सकाळी शाळेत जायचे अन् रात्री चोरी करायचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.