संतोष हत्या प्रकरणात चौकशी केलेल्या महिलेची हत्या झाल्याचा अंजली दमानिया यांना संशय (फोटो - सोशल मीडिया)
बीड : राज्यामध्ये बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या हत्येला एका महिना उलटून गेला असून कारवाईला दिरंगाई झाली आहे. यामुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचे नाव समोर येत आहे. वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्का कारवाई करण्यात आल्यामुळे कराड समर्थक आक्रमक देखील झाले आहेत. यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का कारवाई झाल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये आत्मसर्मपण केले. यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने देखील वाल्मिक कराडवर आरोप केले आहेत. त्याचबरोबर वाल्मक कराडचे समर्थक देखील रस्त्यावर उतरले आहेत. वाल्मिक कराडच्या आईने आंदोलनचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. बीड हत्या प्रकरणात आतापर्यंत इतर आठ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वांवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र, वाल्मिकवर मकोका लावण्यात आला नव्हता. त्याच्यावरही मकोका लावण्यात यावा अशी मागणी होत होती. त्यानंतर आता वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावण्यात आला आहे. मात्र त्याच्यासंबंधित सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अंजली दमानिया यांनी बीड हत्या प्रकरण उचलून धरले आहे. तसेच अनेक धक्कादायक दावे आणि फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत. अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
असे सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला वाल्मिक कराडला एसआयटीने न्यायालयामध्ये हजर केले आहे. मात्र अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोलीस आणि वाल्मिक कराडचा फोटो शेअर केला होता. यामध्ये अंजली दमानिया यांनी लिहिले होते की, मला आलेल्या मेसेज मधे एका सामान्य नागरिकाच्या मनातील भावना, असे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे.
या वाल्मिक कराड ला शासकीय अंगरक्षक होता???
कोणामुळे दिला गेला अंगरक्षक ?
अशा माणसांची सुरक्षा आमच्या कराच्या पैशातून होणार ?
हा माणूस मुख्यमंत्री लाडकी योजनेचा अध्यक्ष ? कोणी केला ह्यांना अध्यक्ष ?
धनंजय मुंडे यांच्या आशिर्वादाने ना ? मग कधी राजीनामा घेणार त्यांचा ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 15, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
खंडणी(३०७), हत्या(३०२), संघटित गुन्हेगारी (मकोका) मध्ये गुन्हेगार असलेल्या, १४ दिवसांपासून आरोपी म्हणून तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडच्या हातात बेड्या का नाहीत ? पोलीस वाल्मिक कराडला आरोपी/गुन्हेगाराची वागणूक न देता एखादी वीआयपी सुरक्षा दिल्यासारखी का दिसत आहे ? गृहविभाग, पोलिस प्रशासन तसेच कायदेतज्ञांनी सांगावे कराडच्या हातात बेड्या का नाहीत. सारखेच गुन्हे असलेले घुले, चाटे, सांगळे यांना बेड्या घालून वागणूक आहे पण वाल्मीक कराडला नाही. कराडच्या हातात बेड्या न घालण्याचे कारण काय ? वाल्मीकची दहशत कि मंत्री धनंजय मुंडेचा दबाव ? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.