Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Crime: ट्रिपल सीट जाताना पाय लागला अन् दोन गट भिडले; मग कोयता काढला आणि थेट…

Crime News: आरोपी ऋषी हा दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होता. त्याचा गणेश यांना पाय लागल्याने ते चौकातच थांबले. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 16, 2025 | 02:35 AM
PCMC Crime: ट्रिपल सीट जाताना पाय लागला अन् दोन गट भिडले; मग कोयता काढला आणि थेट…
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी: चिखली मधील साने चौकात दोन गट आपसात भिडले. दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांवर कोयत्याने वार केले. तसेच कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (१३ एप्रिल) रात्री साडेनऊ वाजता साने चौक, चिखली येथे घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

गणेश अंकुश राख (२४, चिखली) यांच्या फिर्यादीनुसार ऋषी लहाने, योगेश लहाने, अक्षय सपकाळ, अजय शामराव सोनावणे (२६), रोहन बाळासाहेब सावंत (२१, चिखली) आणि इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गणेश हे मित्रासोबत केक आणण्यासाठी साने चौकात गेले होते. त्यावेळी आरोपी ऋषी हा दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होता. त्याचा गणेश यांना पाय लागल्याने ते चौकातच थांबले. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. ऋषी याने इतर आरोपींना बोलावून घेत गणेश यांना मारहाण करत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. गणेश यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची साखळी आरोपींची चोरून नेली.

याच्या परस्पर विरोधात अजय शामराव सोनावणे (२६, चिखली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गणेश राख (२४), विनायक मोरे (२५), संकेत (२३), सौरभ (२०), दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अजय हे रविवारी रात्री रात्रपाळी ड्युटीसाठी कामावर जात होते. साने चौकात आरोपींनी अजय यांना अडवले. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. जुन्या भांडणाच्या रागातून त्यांच्यावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. त्यानंतर कोयता हवेत फिरवून दहशत माजवली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

PCMC Crime: किरकोळ वादातून मारहाण; बॅटने हल्ला करून महिलेस गंभीर दुखापत

बॅटने हल्ला करून महिलेस गंभीर दुखापत

मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाचे पर्यवसान महिलेस बॅटने मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात झाले. या प्रकरणी थेरगाव येथील तिघांविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संदिपनगर, थेरगाव येथे घडली.

या प्रकरणी एक महिला फिर्यादी म्हणून पुढे आल्या असून, अनिल कांबळे व दोन महिला आरोपी (सर्व रा. संदिपनगर, थेरगाव, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीचा लहान मुलगा आणि आरोपींची मुले यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यातूनच आरोपी महिला क्रमांक २ व ३ यांनी फिर्यादीच्या मुलीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

सायंकाळी ६ वाजता फिर्यादी आरोपींच्या घरी जाऊन “माझ्या मुलीला का मारहाण केली?” असे विचारत असताना पुन्हा दोघी आरोपी महिलांनी फिर्यादी व त्यांच्या मुलीला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. या दरम्यान, आरोपी अनिल कांबळे याने घरातून बॅट आणून फिर्यादीच्या डाव्या हातावर जोरदार मारहाण केली. त्यामुळे त्यांचा डावा हात फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली. त्याचप्रमाणे त्यांच्या मुलीला डाव्या हातावर व कमरेवर बॅटने मारहाण करण्यात आली. भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या एका साक्षीदाराच्या पाठीवरही बॅटने मारहाण करून जखमी करण्यात आले.

Web Title: Two groups clashed in chikhali resulting each other being attacked with sickles pcmc crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • PCMC News

संबंधित बातम्या

धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून विवाहितेचा छळ; माहेरहून तीन लाखांची मागणी केली अन् नंतर…
1

धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून विवाहितेचा छळ; माहेरहून तीन लाखांची मागणी केली अन् नंतर…

Jalgaon Fraud News: ऑनलाईन फ्रॉडबाबत महिलांनी रहावे सावध; सीईओंनी दिला खास सल्ला
2

Jalgaon Fraud News: ऑनलाईन फ्रॉडबाबत महिलांनी रहावे सावध; सीईओंनी दिला खास सल्ला

बार्शी हादरली! 14 महिन्याच्या लेकराला विष पाजून आईने घेतला गळफास
3

बार्शी हादरली! 14 महिन्याच्या लेकराला विष पाजून आईने घेतला गळफास

Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट…
4

Crime News: वारसा नोंद करण्यासाठी लाच मागितली अन् तलाठी फसला; ACB ने थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.