Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील पौड फाटा उड्डाणपुलावर अपघात; दुचाकी कठड्यावर आदळून दोघांचा मृत्यू

पौड फाटा चौकातील उड्डाणपुलाच्या कठड्याला भरधाव दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकी चालक महाविद्यालयीन तरुणासह सहप्रवासी मित्राचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 03, 2025 | 01:18 PM
पुण्यातील पौड फाटा उड्डाणपुलावर अपघात; दुचाकी कठड्यावर आदळून दोघांचा मृत्यू

पुण्यातील पौड फाटा उड्डाणपुलावर अपघात; दुचाकी कठड्यावर आदळून दोघांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पौड फाटा चौकातील उड्डाणपुलाच्या कठड्याला भरधाव दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकी चालक महाविद्यालयीन तरुणासह सहप्रवासी मित्राचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे. सर्वेश गोपाळ पाटील (वय २०), पुष्कर सुधाकर चौधरी (वय १९, दोघे रा. तुरक गुऱ्हाडा, जि. बऱ्हानपुर, मध्य प्रदेश) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार निषाद कोंडे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सर्वेश व त्याचा मित्र पुष्कर हे सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास पौड रस्त्याने निघाले होते. पौड फाटा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाजवळ आल्यानंतर सर्वेशचे भरधाव दुचाकीवरील नियत्रंण सुटले आणि तो कठड्यावर जाऊन आदळला. अपघातात दुचाकीस्वार सर्वेश आणि त्याचा मित्र पुष्कर यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.

अपघातात मृत्यू झालेले सर्वेश आणि पुष्कर हे दोघे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, अशी माहिती कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने यांनी दिली. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार अडागळे तपास करत आहेत.

Web Title: Two killed in accident on paud phata flyover in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • Bike Accident
  • crime news
  • Death
  • Pune Accident
  • Pune Crime

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

Viral News :अमेरिकेत कुत्र्याच्या जीवासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा; अखेर ‘ब्रूस’ला देण्यात आला मृत्यू
2

Viral News :अमेरिकेत कुत्र्याच्या जीवासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा; अखेर ‘ब्रूस’ला देण्यात आला मृत्यू

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
3

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

Ananya Raj Death: धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीचं २७व्या वर्षी निधन; मृत्यूचं कारण समोर, चाहत्यांना मोठा धक्का
4

Ananya Raj Death: धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीचं २७व्या वर्षी निधन; मृत्यूचं कारण समोर, चाहत्यांना मोठा धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.