अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला 3 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह, उल्हासनगरमध्ये धक्कादायक घटना
उल्हानगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कारण गेल्या चार दिवसांपासू बेपत्ता असलेल्या 3 वर्षीय चिमुकलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडून आला.हिललाईन पोलीस ठाण्यामागील प्रेमनगर टेकडी परिसरात एक मृतदेह आढळून आला असून या घटनेनंतर नागरिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उल्हासनगरमधील प्रेमनगर टेकडी एक महिला तिच्या 3 मुलींसह वास्तव्याला आहे. ही महिला १८ नोव्हेंबरला डॉक्टरकडे जात असताना तिची मुलगी बेपत्ता झाली होती. याबाबत तिने दिलेल्या तक्रारीवरून हिललाईन पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर चार दिवसांनी आज प्रेमनगर टेकडीवरील झाडा-झुडपांच्या परिसरात एका मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. घटनेची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. बेपत्ता झालेल्या मुलीचाच मृतदेह आहे का? तिची फक्त हत्या झाली आहे? की त्यापूर्वी तिच्यासोबत काही दुष्कृत्य सुद्धा झालं आहे? या सगळ्याचा तपास आता पोलिसांकडून सुरू असून वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच सर्व गोष्टी समोर येतील, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. सदरचे कृत्य ज्याने कुणी केलं आहे, त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत बेपत्ता मुलीच्या आईसह स्थानिकांनी हिललाईन पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. तर परिसरातील महिलांनीही चिमुकलीला न्याय देण्याची मागणी करत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
आज दुपारच्या सुमारास तिचा अर्धवट जाळलेला अवस्थेत मृत्तदेह हिल्लानई पोलीस स्टेशनच्या मागे आढळून आला त्यानंतर पोलिसांनी सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आहे, शवच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण कळू शकेल असं परिमंडळ चार चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितलं.