crime (फोटो सौजन्य: social media )
उल्हासनगरमधून एका प्री-स्कूलमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. इंग्रजीत कविता शिकवताना चिमुकल्याने टाळ्या वाजवल्या नाही म्हणून शिक्षिकेने त्याला मारहाण केल्याचा समोर आले आहे. मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अखेर पोलिसांनी शिक्षकेविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. उल्हासनगरमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.
Nashik Crime: लोकशाहीच्या स्तंभावरच जीवघेणा हल्ला; मारहाणीत पत्रकार जखमी अन् भुजबळ अॅक्शन मोडमध्ये
व्हिडिओमध्ये काय?
या व्हिडिओमध्ये एका चिमुकल्याला कविता शिकवताना शिक्षिका टाळ्या वाजवायला सांगते. मात्र चिमुकला टाळ्या वाजवत नाही. म्हणून याचाच राग करत शिक्षिकेने या चिमुकल्याला एकदा दोनदा नाहीतर तीनदा मारहाण केली आहे. शेवटी हा चिमुकला शिक्षकच हात पकडतो.
गुन्हा दाखल
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी तपास सुरू केला. हा व्हिडीओ उल्हासनगर परिसरातील एक्सीलेंट किल्ड वर्ल्ड या प्री-स्कूलच्या असल्याचे समोर आले. या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलिसांनी शिक्षिका गायत्री पात्रा विरोधात बाळ संरक्षण कायदा (75) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. मात्र या प्रकरणामुळे पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
उल्हासनगर हादरलं! किरकोळ वादातून 30 वर्षीय युवकाची हत्या, मुख्य आरोपी अटक
उल्हासनगरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. किरकोळ कारणातून ३० वर्षीय युवकाची धारदार शास्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. उल्हासनगरमधील कॅम्प 1 येथील साईबाबा मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीच नाव साजिद शेख असं आहे. याप्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपी फरार आहेत. याप्रकरणी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
नेमकं काय घडलं?
१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साजिद शेख आणि रोहित पासी यांची भेट झाली होतो. त्यांच्यात झालेल्या वादावर चर्चा करण्यासाठी हे दोघे पुन्हा एकत्र आले होते. मात्र, चर्चा शांतपणे न सुटत वाद वाढला. त्या रात्री सुमारे अडीच वाजता साजिदच्या मित्राने रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जीनवाल यांना अडवला. त्यानंतर साजिदला फोन करून बोलावून घेतलं. साजिद मदतीसाठी घटनास्थळी पोहोचताच,आधीपासूनच दबा धरून बसलेल्या 15 ते 20 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. साजिद गंभीर जखमी झाला होता त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
उल्हासनगर पोलिसांनी आरोपी रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जीनवाल याला अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस करत आहे. साजिदची पत्नी गरोदर आहे. जो पर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मी साजिदचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा तीव्र आक्रोश तिने व्यक्त केला आहे. पोलिसांनी मुख्य दोन आरोपींना अटक केली आहे आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.
पुण्यातील आयटी इंजिनिअर दाम्पत्याची फसवणूक; तब्बल सव्वा कोटींना घातला गंडा