crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पुण्याच्या खेड तालुक्यातून एक हृदयपिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगायच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ती मागील अकरा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. मात्र ही झुंज अपयशी ठरली. अश्विनी केदारी ही २०२३ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत महिला प्रवर्गात राज्यात पहिली आली होती. तिच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
Ayush Komkar News: आयुष कोमकरच्या मृतदेहावर आज अत्यंसंस्कार; तुरुंगात असलेल्या वडिलांना पॅरोल मंजूर
८० टक्के भाजल्याने उपचारादरम्यान मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी अश्विनी केदारी ही सकाळी अभ्यास करत होती. तिने आंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवले होते. त्यानुसार पाणी किती गरम झाले आहे, हे पाहण्यासाठी जेव्हा ती बाथरूममध्ये गेली त्यावेळी हीटरचा मोठा झटका तिला लागला. या शॉकमुळे उकळते पाणी तिच्या अंगावर सांडले. या भीषण अपघातात ती तब्बल 80 टक्के भाजली. हा प्रकार समोर येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने पिंपरी चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करत उपचार सुरु केले. या दरम्यान गेल्या ११ दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. मात्र ती यात अपयशी ठरली. तिचा उपचारादरम्यान तिचे दुर्दैवी निधन झाले आहे.
महाराष्ट्रातून अव्वल
२०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रात मुलींमधून अश्विनी केदारी ही पहिली आली होती. अश्विनीचा अकस्मात मृत्यू झाल्याने अश्विनी केदारींच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून सर्वत्र सध्या हळहळ व्यक्त केला जात आहे. अश्विनीने केदारी ही पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील शेतकरी कुटुंबातील होती.
संतापजनक! पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग
पुण्यात तब्बल ३३ तासांहून अधिक काळ चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले. घरगुती तसेच मोठ्या मंडळातील गणपतींचे विसर्जन पार पडले. मात्र, या भक्तिरसात एक धक्कादायक घटना घडली. मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा पथकातील सदस्यांनी एका महिला पत्रकाराचा विनयभंग केला. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन ढोल-ताशा सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात विसर्जन मिरवणुका पार पडल्या. पुण्यातही दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. त्याच ठिकाणी वार्तांकनासाठी गेलेल्या २० वर्षीय महिला पत्रकार व त्यांच्या सहकाऱ्याला पथकातील सदस्यांकडून अडथळा आणण्यात आला आणि त्यानंतर विनयभंगाची घटना घडली.