छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. संभाजीनगरमधील एका अकॅडमीच्या संचालकाने आपल्याच प्रशिक्षणार्थी विध्यार्थी अमोल डक याच अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणामुळे अकॅडमीच्या संचालकाने आपल्या प्रशिक्षणार्थीचं अपहरण केलं आहे. या प्रकरणात आरोपी संचालकाला अटक करण्यात आली असून संचालकांसह आणखी तीन जणांचा समावेश आहे. न्यायालयाने चौघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Ayush Komkar News: आयुष कोमकरच्या मृतदेहावर आज अत्यंसंस्कार; तुरुंगात असलेल्या वडिलांना पॅरोल मंजूर
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरमधील हिंदवी करिअर अकॅडमीचा संचालक दशरथ जाधव याचं अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडलं होतं. यामुळे त्याने विध्यार्थी अमोल डख याची मदत घेतली होती. मात्र आपला चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचे अमोलच्या लक्षात येताच संचालक आणि त्याच्यामध्ये वाद झाला. यानंतर दशरथ यांनी अमोलला अकॅडमीमधून काढून टाकलं.
मात्र अमोलकडे दशरथच्या प्रेमसंबंधाचे काही व्हॉइस रेकॉर्डिंग आणि पुरावे होते. तो आपलं बिंग फोडेल ही त्याला भीती त्याने होती. या भीतीने दशरथने अमोलचं अपहरण करण्याचं ठरवलं.अपहरण करण्यासाठी दशरथने दोन मुलांची मदत घेतली आहे. त्याने आधी अमोलला केळगाव घाटात बोलावलं. अमोल तिथे येताच त्याला मारहाण करून त्याच्याकडून सर्व पुरावे घेतले. नंतर त्याला कारमध्ये टाकून त्याच अपहरण केलं. त्याला सिल्लोडला घेऊन जाण्याचा प्लॅन होता. मात्र त्याच दरम्यान एका ओळखीच्या व्यक्तीने अमोलला दशरथसोबत गाडीत पाहिलं. त्याने हा सर्व प्रकार अमोलच्या घरी सांगितला. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत अमोलची सुटका केली आहे.
धक्कादायक! गणपती बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; चाकण परिसरात चार तरुण पाण्यात बुडले
गणेशोत्सवाच्या उत्साहात आणि भक्तिभावात विसर्जन मिरवणुका सुरू असताना चाकण परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी (ता. खेड) येथील पाणवठ्यांमध्ये गणेश विसर्जन करताना चार तरुण पाण्यात बुडाले. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून, एकाचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वाकी बुद्रुक – भामा नदीत दोन युवक बुडाले
वाकी बुद्रुक येथील प्रियदर्शन शाळेजवळील भामा नदीत अभिषेक संजय भाकरे (२१, रा. कोयाळी, ता. खेड) व आनंद जयस्वाल (२८, रा. उत्तरप्रदेश) हे दोघे विसर्जनासाठी उतरले होते. यावेळी पाण्याच्या खोलवर गेल्याने ते बुडाले. यामध्ये आनंद जयस्वाल याचा मृतदेह सापडला, तर अभिषेक भाकरे याचा शोध अजूनही सुरू आहे. शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे रवींद्र वासुदेव चौधरी (४५) हे नदीत विसर्जन करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांचा मृतदेह शोध पथकांना सापडला असून, त्याला चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.