
खळबळजनक! थेट कोल्हापूरचे कलेक्टर ऑफिसच Bomb ने उडवण्याची धमकी; ईमेल येताच...
मोठी बातमी! पंजाबमध्ये हायअलर्ट; शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी, ‘या’ शहराला छावणीचे स्वरूपत्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) घटनास्थळी दाखल झाले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची आणि परिसराची कसून तपासणी सुरू आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाचे जवान देखील त्यांच्या वाहनांसह कार्यालयाच्या आवारात तैनात झाले आहेत. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त धमकीचा ई-मेल मिळताच संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातला आहे.
प्रवेशद्वारावर कडक तपासणी
अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी निर्बंध राखण्यात घालण्यात येणार आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आणि प्रशासन दोन्ही पातळ्यांवर सतत समन्वय ठेवण्यात येत आहे. धमकी कोणत्या ई-मेल आयडीवरून पाठवली गेली? ती आयडी कोणाची? कुठून हा मेल पाठवण्यात आला? याचा तपास सायबर सेलने सुरू केला असून, तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धमकीची सत्यता तपासण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी
पंजाबमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पंजाबमधील अमृतसर शहरातील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली आहे. बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त होताच शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर काढण्यात आले आहे. बॉम्बची धमकी मितळच एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य पाहता प्रशासनाने सरकारी आणि खाजजीआय शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.