Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अज्ञात चोरट्यांची वृद्ध दाम्पत्यास मारहाण; 6 तोळे सोन्याचे दागिनेही केले लंपास

वृद्ध दाम्पत्य झोपलेले होते. अज्ञात तीन चोरट्यांनी अंगावरील पांघरूणे काढून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना विरोध करत असताना कमल जाधव यांच्या डाव्या पायावर जोरात मारहाण करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 22, 2025 | 01:24 PM
अज्ञात चोरट्यांची वृद्ध दाम्पत्यास मारहाण; 6 तोळे सोन्याचे दागिनेही केले लंपास

अज्ञात चोरट्यांची वृद्ध दाम्पत्यास मारहाण; 6 तोळे सोन्याचे दागिनेही केले लंपास

Follow Us
Follow Us:

पारगाव शिंगवे : अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल व जाळी उचकटून घरात प्रवेश केला. यामध्ये झोपलेल्या वृद्ध दाम्पत्यास जबर मारहाण केली. याशिवाय, महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने असा १ लाख ८६ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरट्याने लंपास केला. ही घटना (दि.२१) रात्री एक वाजण्याच्या सुमारास काठापूरच्या गणेश वस्ती (ता.आंबेगाव) या ठिकाणी घडली.

कमल ज्ञानेश्वर जाधव (वय ७५, रा. काठापूर) व पती ज्ञानेश्वर जाधव (वय ८३) असे मारहाण झालेल्या वृद्ध दाम्पत्याचे नावे आहे. या घटनेची फिर्याद कमल ज्ञानेश्वर जाधव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काठापुरच्या गणेश वस्तीमध्ये कमल ज्ञानेश्वर जाधव व पती ज्ञानेश्वर जाधव रात्री जेवण करून घरामध्ये झोपले होते. रात्री एक वाजता सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी घराच्या पाठीमागील लोखंडी ग्रिल व जाळी उचकटून घरात प्रवेश केला.

दरम्यान, यावेळी वृद्ध दाम्पत्य झोपलेले होते. अज्ञात तीन चोरट्यांनी अंगावरील पांघरूणे काढून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना विरोध करत असताना कमल जाधव यांच्या डाव्या पायावर जोरात मारहाण करण्यात आली. त्यांच्या पायाला मोठी जखमी झालेली आहे.

सोन्याचे दागिनेही काढून घेतले

वृद्ध महिलेचे साडेतीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र व दोन सोन्याच्या वाट्या तसेच दीड तोळ्याचे सोन्याचे मणी, डोरले व भोरमाळ असे एकूण सहा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी काढून घेतले. तसेच पती ज्ञानेश्वर जाधव यांना जबर मारहाण करण्यात आली. डाव्या पायाला मोठी दुखापत झाली.

चोरीच्या घटनेची पोलिसांना दिली माहिती अन्…

वृद्ध महिलेने चुलत दीर नवनाथ जाधव यांना फोन केला. नवनाथ व इतर गावातील लोकांनी या चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जखमी दाम्पत्याला ॲम्बुलन्सने ओम हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणण्यात आले. दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. पोलिसांचे ठसे पथक व श्वन पथक दाखल झाले होते.

Web Title: Unknown thieves beaten up elderly couple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 01:24 PM

Topics:  

  • crime news
  • Gold Theft
  • Theft Cases

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.