Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: सेवानिवृत्त सुभेदाराकडून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार असून तो बोपखेले येथे भाडेतत्वावर राहण्यास आहे. त्याची पत्नी आणि मुले दुसऱ्या ठिकाणी राहतात. 

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 15, 2025 | 06:26 PM
Crime News: सेवानिवृत्त सुभेदाराकडून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
Follow Us
Follow Us:

पिंपरी: सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदाराने १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी स्थानिकांनी त्याला पकडून मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. बोपखेले येथे रविवारी (दि. १३ एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.  लाला मोहम्मद शेख (६५, रा. रामनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल झालेल्या सेवानिवृत्त सुभेदाराचे नाव आहे.

पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने याप्रकरणी सोमवारी (दि. १४ एप्रिल) दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार असून तो बोपखेले येथे भाडेतत्वावर राहण्यास आहे. त्याची पत्नी आणि मुले दुसऱ्या ठिकाणी राहतात.

दरम्यान, शेख हा त्याच्या खोलीत पीडीत १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत होता. याबाबत स्थानिक नागरिकांना माहिती मिळाली. त्यांनी शेख याला पकडून मारहाण केली. तसेच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाणीत जखमी झाल्याने शेख याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांनी शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

ट्रिपल सीट जाताना पाय लागला अन् दोन गट भिडले

चिखली मधील साने चौकात दोन गट आपसात भिडले. दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांवर कोयत्याने वार केले. तसेच कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (१३ एप्रिल) रात्री साडेनऊ वाजता साने चौक, चिखली येथे घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Ayodhya Ram Mandir : अयोध्यातील राम मंदिरासह उत्तर प्रदेशातील १०-१५ जिल्ह्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट

गणेश अंकुश राख (२४, चिखली) यांच्या फिर्यादीनुसार ऋषी लहाने, योगेश लहाने, अक्षय सपकाळ, अजय शामराव सोनावणे (२६), रोहन बाळासाहेब सावंत (२१, चिखली) आणि इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गणेश हे मित्रासोबत केक आणण्यासाठी साने चौकात गेले होते. त्यावेळी आरोपी ऋषी हा दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होता. त्याचा गणेश यांना पाय लागल्याने ते चौकातच थांबले. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. ऋषी याने इतर आरोपींना बोलावून घेत गणेश यांना मारहाण करत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. गणेश यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची साखळी आरोपींची चोरून नेली.

बॅटने हल्ला करून महिलेस गंभीर दुखापत

मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाचे पर्यवसान महिलेस बॅटने मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात झाले. या प्रकरणी थेरगाव येथील तिघांविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संदिपनगर, थेरगाव येथे घडली.

Web Title: Unnatural molested on minor boy retired subedar bopkhel pcmc crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 06:26 PM

Topics:  

  • crime news
  • PCMC News
  • PCMC POLICE

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.