संग्रहित फोटो
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहत परिसरात शुक्रवारी (२० फेब्रुवारी) रात्री पावणेअकराच्या सुमारास चौघे अल्पवयीन दुचाकीवरुन आले. ‘आम्ही या भागातील भाई आहोत, येथे आमचीच चालणार. या भागात राहायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल’, असे सांगून अल्पवयीनांनी त्यांच्याकडील पिस्तुल उगारून दहशत माजविली. नागरिकांना शिवीगाळ करुन अल्पवयीनांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला, तसेच अल्पवयीनांनी नागरिकांना शस्त्राचा धाक दाखविला.
या घटनेनंतर अल्पवयीन दुचाकीवरुन पसार झाले. गोेळीबाराच्या घटनेनंतर परिसरातील नागरिक भयभीत झाले. त्यांनी या घटनेची माहिती त्वरीत पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडने तपास सुरू केला. पसार झालेल्या चौघा अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
तिघांनी केला तरुणाचा खून
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिबवेवाडी परिसरात कटींग दुकानात काम केल्यानंतर गावाला जातो अस म्हणून स्वतःचे सलूनचे दुकान सुरू करणाऱ्या तरूणाचा तिघांनी मिळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहमद्द शमी (वय २५, अप्पर जुना बसस्टॉप, बिबवेवाडी मुळ रा. प्रयागराज, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत मोहम्मद सलमान फिरोज कुरेशी (वय १८, रा. साई स्मार्ट, तिरूपती भेळ शेजारी, जुना बसस्टॉप, बिबवेवाडी) याने बिबवेववाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी खुन करणारे आरोपी सौरभ चोरगे, अनिकेत सराटे, रोहित बालशंकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार गुरूवारी सायंकाळी घडला आहे.






