Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सहाय्यक पोस्टमास्तरची आत्महत्या; सुसाईड नोटमधून तरुणाची आर्त हाक

उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे 26 वर्षीय सहाय्यक शाखा पोस्टमास्तर निखिल वर्मा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळ आणि पैशांच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी दोन अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 15, 2026 | 10:17 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सहाय्यक पोस्टमास्तर निखिल वर्मा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
  • सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक छळ व पैशांच्या मागणीचे आरोप.
  • दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; आरोपी सध्या फरार.
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय सहाय्यक शाखा पोस्टमास्तरने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने तीन पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली. या चिठ्ठीत त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर वारंवार मानसिक छळ आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. माझ्या मृत्यूनंतर दोषींना शिक्षा होईपर्यंत माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नका, अशी आर्त हाकही त्याने या चिठ्ठीत आपल्या कुटुंबीयांना दिली आहे. या सुसुईड नोटमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तरप्रदेश येथील मैनपुरी जिल्ह्यात घडली.

काय नेमकं प्रकरण?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव निखिल वर्मा असे आहे. निखिलने त्याच्या घराजवळील शेतात असलेल्या एक छोट्या खोलीत गळफास लावून आपले जीवन संपवले. बराच वेळ तो न दिसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला तेव्हा त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या खिशात सुसाईड नोट सापडली. त्याने आपल्या पालकांची माफी मागत आपली व्यथा मांडली होती.

Sangli Crime: माथाडी कामगार नेत्याच्या नातवाची निर्घृण हत्या; चार दिवसांनी मुख्य आरोपी अटकेत

सुसाईड नोट मध्ये काय?

‘मी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलो आहे. पोस्टल अधीक्षक माझ्याकडे पैशांची मागणी करत असून, पैसे न दिल्यास नोकरी करू देणार नाही, अशी धमकी दिली जात आहे. माझ्या मृत्यूला मेल ओव्हरसीअर आणि पोस्टल अधीक्षक जबाबदार आहेत,’ असे निखिलने चिठ्ठीत नमूद केले आहे.

पैसे न दिल्यास नोकरीवरून काढून टाकू…

निखिलचे वडील धर्मेंद्र यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल हा जिल्ह्यातील मुदई उप-टपाल कार्यालयात कार्यरत होता. सुट्ट्या मंजूर करण्यासाठी तेथील मेल ओव्हरसीअर त्याच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत होता. या पैशांमध्ये पोस्टल अधीक्षकांचाही वाटा असतो, असे सांगून निखिलला धमकावले जात होते. पैसे न दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची भीती सतत दाखवली जात असल्याने निखिल गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता, असे त्याच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

Palghar Crime: भरदिवसा तरुणीवर हल्ला करून फरार, आरोपीचे आत्महत्येचे दोन प्रयत्न फसले; अखेर पोलिसांच्या ताब्यात

तब्बल 10 तास धरणे आंदोलन

पोलिसांनी पोस्टल अधीक्षक सुशील कुमार यांच्यासह दोन अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती मिळताच अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करावी अशी मागणी करत तब्बल 10 तास धरणे आंदोलन निखिलच्या कुटुंबीयांनी केली. अखेर पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील आरोपी अधिकारी सध्या फरार आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: निखिल वर्मा यांनी आत्महत्या का केली?

    Ans: वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा मानसिक छळ आणि पैशांच्या मागणीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये केला आहे.

  • Que: सुसाईड नोटमध्ये निखिलने काय लिहिले होते?

    Ans: ‘माझ्या मृत्यूस मेल ओव्हरसीअर आणि पोस्टल अधीक्षक जबाबदार आहेत,’ असे त्यांनी नमूद केले होते.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Uttar pradesh crime assistant postmaster commits suicide driven to the edge by harassment from senior officials young mans anguished plea revealed in suicide note

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.