
crime (फोटो सौजन्य: social media)
Drugs Case : अहिल्यानगर पोलिसांचा एलसीबी संशयाच्या भोवऱ्यात; सहभाग कोणा-कोणाचा? तपास सुरू
काय नेमकं प्रकरण?
मंगळवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडेसातच्या सुमारास गावातील दोन्ही मुली क्लाससाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्या क्लासला पोहोचल्या नाहीत. सकाळी साडेनऊच्या सुमारास गावाबाहेरील शेतातील विहिरीजवळ त्यांची दप्तरे आढळून आली. ग्रामस्थांनी विहिरीत वाकून पाहिले असता दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. पोहणाऱ्यांच्या मदतीने दुपारी बारा वाजता एका मुलीचा तर एक वाजता दुसऱ्या मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.
पालकांनी मुली बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गावातील दोन संशयितांना ताब्यात घेतले. यापैकी एकाने मुलींना विहिरीत ढकलल्याचा संशय आहे. काल (मंगळवारी, ता २७) रात्री उशिरा एका मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एकतर्फी प्रेमातून दोन्ही मुलींची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती
या घटनेबाबात माहिती देताना पोलिस अधीक्षक जळगाव डॉ महेश्वर रेड्डी म्हणाले, दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या म्हणून भुसावळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त झाली होती. दोन्ही मुलींचं वय अंदाजे पंधरा वर्षे आहे. तक्रार मिळताच आम्ही शोध सुरू केला. यावेळी साखरी गावाजवळ विहीरीत दोन मृतदेह आढळून आले दोन्ही मृतदेह आम्ही पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत, ही घटने नेमकी कशी घडली याचा तपास सुरू आहे, संशयितांना ताब्यात घेतलं आहे, याप्रकरणी सर्व तपास पूर्ण झाला की बाकी माहिती तुम्हाला देण्यात येईल असंही रेड्डी यांनी म्हटलं आहे.
ग्रामस्थांचा संताप
आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी बसून राहिले. जमावाकडून आरोपींची घरे पेटवण्याचा प्रयत्न झाल्याने गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
Ans: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील एका गावात.
Ans: दोन्ही मुली अंदाजे १५ वर्षांच्या व नववीत शिकत होत्या.
Ans: एकतर्फी प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.