काय घडलं नेमकं?
२० वर्षीय आरोपी प्रज्वल खेडकर हा पाचपावली नागपूरचा रहिवासी असून बांधकाम साईटवर टाईल्स फिटिंगचे कामे करतो. आरोपीने पीडित मुलीशी इंस्टाग्रामवरून मैत्री केली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिला घरी आणले. त्याने मुलीचे आडनाव खेडकर आणि वय २० वर्षे दाखवत तिचे आधार कार्ड बनवून घेतले होते. पीडित अल्पवयीन असल्याकने तिला या गंभीर परिणामाची कल्पना नव्हती.
डॉक्टरांना संशय आणि प्रकार आला समोर
पीडित मुलीची तब्येत बिघडली तेव्हा तिला रुगालयात दाखल करण्यात आले. तिथे तिने एका बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनी तिच्या वयाची शंका आली आणि त्यांनी तिला शाळा सोडल्याचा दाखला मागितला. त्यातून तिचे खरे वय १७ असल्याचे समोर आले. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी माहिती मिळताच तपासाला सुरु केली.
पोलिसांनी पीडितेचा बयाण घेतला. तिच्या बायनावरून आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायालयात हजार करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
Drugs Case : अहिल्यानगर पोलिसांचा एलसीबी संशयाच्या भोवऱ्यात; सहभाग कोणा-कोणाचा? तपास सुरू
Ans: पीडितेने रुग्णालयात बाळाला जन्म दिल्यानंतर डॉक्टरांना वयाबाबत संशय आला आणि तपासात ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.
Ans: इंस्टाग्रामवर मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवले, बनावट आधार कार्ड तयार केले आणि अत्याचार केला.
Ans: पीडितेच्या बयानावरून आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले.






