'86 वर्षांच्या आजी विनवणी करत होत्या पण...,' दारूच्या नशेत 24 वर्षीय तरुणाने केला लैंगिक अत्याचार (फोटो सौजन्य-X)
Uttar pradesh Crime News Marathi: उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातून एक लज्जास्पद आणि भयानक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत एका २४ वर्षीय तरुणाने त्याच्याच गावातील ८० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेचे कुटुंब आणि पोलिस दोघेही हादरले आहे. मानवतेला लाजवेल अशी ही घटना अमेठी कोतवाली परिसरातील एका गावात घडली असून जिथे २४ वर्षीय क्रूर मोहम्मद इश्तियाक अली याने आजारी असलेल्या ८० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केला.
पीडितेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ही घटना ७ फेब्रुवारीच्या रात्री घडली. जेव्हा वृद्ध महिलेचे संपूर्ण कुटुंब शेजारील एका कार्यक्रमात जेवणासाठी गेले होते आणि वृद्ध महिला घरात एकटी होती. यानंतर त्याच गावातील इश्तियाक अली हा तरुण रात्री १२:३० ते २:०० च्या दरम्यान घरात घुसला आणि वृद्ध महिलेला एकटी पाहून त्याने प्रथम तिचा गळा दाबला आणि नंतर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. गुन्हा केल्यानंतर तरुण पळून गेला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती वृद्ध महिला गेल्या तीन-चार वर्षांपासून आजारी होती आणि अंथरुणाला खिळलेली होती.
कार्यक्रम संपल्यानंतर कुटुंबातील सदस्य घरी परतले तेव्हा घरात प्रवेश करताच त्यांना धक्काच बसला. जेव्हा कुटुंबातील सदस्यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांना धक्का बसला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. सध्या कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे, आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीचा शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील कटपाडीजवळ एका गर्भवती महिलेवर अत्याचार प्रयत्न करून तिला चालत्या ट्रेनमधून बाहेर ढकलल्याची घटनाही समोर आली होती. आरोपीला अटक करण्यात आली आहे.