Beed Crime: वाढदिवसाला न बोलावल्याचा मनस्ताप; २४ वर्षीय तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या
हातपाय बांधून केला अत्याचार
ज्या तरुणीवर अत्याचार झाला ती जवळच असणाऱ्या एका घरात मजूरीच काम करते. त्या घरी जात असताना तिला वाटेत पाऊस लागला आणि ती एका इमारतीच काम सुरू असणाऱ्या इमारतीच्या खाली येवून उभी राहिली. त्यानंतर एका मजुराने तिला ओढत नेल आणि घरात नेवून तिचे हात पाय बांधण्यात आले आणि तिने आरडा ओरड करू नये यासाठी तिच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला. तिचे हात पाय बांधून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केला आहे. सीतापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते पाच ही जण सीतापूरचे रहिवाशी असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मुलगी तिसऱ्या मजल्यावर पडली बेशुद्ध
मजूराने तिला ओढत नेल्यावर तो तिला तिसऱ्या मजल्यावर घेवून गेला आणि पाच जण तिच्यावर अत्याचार करत होते. ती मुलगी बेशुद्ध पडली. कामावर मुलगी का आली नाही हे जेव्हा विचारणा केली तेव्हा बाजूच्या इमारतमध्ये एक मुलगी बेशुद्ध असल्याचं समजलं आणि त्या नंतर ही घटना समोर आली आहे. ज्या इमारतीवर मजूर काम करत होते. त्यांना नागरिकांनी बेदम चोप दिला आणि तिला बेशुद्ध अवस्थेत बघताच तिथून सगळ्यांनी पळ काढला. आता या घटनेत अधिकचा तपास केला जात आहे. मुलीला रुग्णालयात भरती करण्यात आल आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र अंधाराचा आणि पावसाचा फायदा घेत नराधमांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे.
Ans: उत्तर प्रदेशातील लखनौ येथे.
Ans: तरुणीला ओढून नेऊन हातपाय बांधून अत्याचार केला.
Ans: तिला रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर आहे.






