काय घडलं नेमकं?
महेशने आपल्या घराच्या छतावर पाणी पिण्याच्या ताब्यात विषारी द्रव्य मिसळून प्राशन केले. दुपारी तो एकटाच छतावर झोपायला गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो खाली न आल्याने रात्री ८ वाजेच्या सुमारास कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी घराच्या छतावर गेले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आत्महत्येपूर्वी महेशने आपल्या मोबाईलवर माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो” असे हृदयद्रावक स्टेटस ठेवले होते. सोमवारी त्याच्या एका मित्राच्या वाढदिवस होता. महेशला यावेळेस मित्रांनी बोलावले नाही आणि त्याला सोडूनच इतरांनी सेलिब्रेशन केले. त्यामुळे तो नैराश्यात गेला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचललं आहे अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.
बीड हादरलं! 17 वर्षीय विवाहित मुलीचा विहिरीत संशयास्पद आढळला मृतदेह
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विहिरीत संशयास्पद मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती. पोलीस तिचा तपास करत होते. मात्र आता तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वयाच्या १६ व्या वर्षी तिचा बालविवाह वडवाणी तालुक्यातील एका गावात तरुणाशी झाला होता.
वर्षभरापूर्वी विवाह झाल्याचा पोलिसांना संशय
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत्यूवेळी मुलगी १७ वर्षे १० महिन्यांची होती. यावरून लक्षात येतो की, तिचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. ‘तिच्या लग्नाची पुष्टी केल्यानंतर तिचा बालविवाह असल्यास मुलीचे आई-वडील आणि सासू-सासरच्या मंडळींवर कठोर फौजीदारी कारवाई केली जाईल,’ असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुलीच्या मृत्यूचे कारण, तिच्या माहेरी दिर्घकाळ राहण्याचे कारण समोर आलं नाही. हे प्रकरण आत्महत्या आहे की, हत्या याचा पोलीस दोन्ही बाजूने तपास करत आहेत.
Sangli Crime: यात्रेत धक्काबुक्कीचा वाद जीवावर; कवलापूरमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा खून, आरोपी अटकेत






