Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh News: उपचारासाठी 25 हजारांची मागणी? डॉक्टरांच्या निष्काळजीपणा विरोधात विधवा महिलेची तक्रार

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे १४ वर्षीय मानसिक रुग्ण मुलीच्या उपचारासाठी डॉक्टरांनी पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका विधवा महिलेने केला आहे. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचे हाड पुन्हा मोडल्याचा दावा करण्यात आला असून, सीएमओंनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 04, 2026 | 01:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • उपचारासाठी रुग्णालय कर्मचाऱ्यांनी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप.
  • डॉक्टरांनी जबरदस्तीने गुडघा वाकवल्याने मुलीचे हाड पुन्हा मोडल्याचा दावा.
  • प्रकरणाची गंभीर दखल घेत सीएमओंकडून चौकशीचे आदेश.
उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात सरकारी रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय मानसिक रुग्ण मुलीच्या उपचारासाठी पैसे उकळल्याचा आणि निष्काळजीपणामुळे तिच्या पायाला गंभीर इजा झाल्याचा आरोप एका विधवा महिलेने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर केला आहे. न्याय मिळावा म्हणून ही महिला आपल्या मुलीसह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आधी प्रेमविवाह केला अन् नंतर हुंड्यासाठी छळ झाला; अखेर नवविवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील आरोप करणाऱ्या महिलेचे नाव रेश्मा असे आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी त्यांच्या मुलीच्या उजव्या पायावरील हाडाच्या दुखापतीवर जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या उपचारासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी केली. आपण विधवा असून इतकी रक्कम देऊ शकत नसल्याचे सांगितले. तर डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार देण्यात आला असा आरोप महिलेने केला आहे.

त्यानंतर रेश्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना (सीएमओ) मुलीवर मोफत उपचार करण्याचे आदेश दिले. मात्र या आदेशानंतरही रुग्णालय कर्मचाऱ्यांनी ८ हजार रुपये घेतल्याचा दावा महिलेने केला आहे. तसेच उर्वरित रक्कम नंतर जमा करण्यास सांगण्यात आल्याचेही तिने म्हटले आहे.

शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी तपासणीसाठी मुलीला पुन्हा रुग्णालयात बोलावण्यात आले होते. त्यावेळी शस्त्रक्रिया करणारे डॉ. चतुर्वेदी यांनी मुलीचा गुडघा जबरदस्तीने वाकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलगी वेदनेने ओरडू लागली आणि तिच्या पायातील हाड मोडल्यासारखा आवाज आल्याचा दावा महिलेने केला आहे. ही बाब डॉक्टरांना सांगितले असता त्यांनी कोणतीही दखल न घेता त्यांना तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर खासगी ठिकाणी एक्स-रे काढण्यात आला असता मुलीचे हाड पुन्हा मोडल्याचे समोर आल्याचे रेश्मा यांनी सांगितले. यानंतर त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांकडे तक्रार केली, मात्र कुणीही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप महिलेने केले आहे.

चौकशीचे आदेश

गंभीर आरोपांनंतर मुझफ्फरनगरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी सुनील तेवतिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या पक्षाचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच चौकशीत डॉक्टर किंवा रुग्णालय कर्मचाऱ्यांची कोणतीही निष्काळजीपणा अथवा गैरप्रकार आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही सीएमओंनी म्हटले आहे.

Ratnagiri Crime: चिपळूणमध्ये एसीबीची धडक कारवाई! गर्भपाताच्या गोळ्यांसाठी लाच घेताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर रंगेहात अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित महिलेने कोणावर आरोप केले आहेत?

    Ans: जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर पैसे उकळणे व निष्काळजीपणाचे आरोप करण्यात आले आहेत.

  • Que: मुलीच्या उपचारासाठी किती पैशांची मागणी करण्यात आली होती?

    Ans: सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणात प्रशासनाने काय भूमिका घेतली?

    Ans: मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Web Title: Uttar pradesh news demand for 25000 for treatment widow files complaint against doctor for negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.