Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh: ३९ कोटींच्या विम्यासाठी मुलाने रचला कट; आई-वडिलांना ठार करून दाखवला अपघात, पत्नीच्या मृत्यूनंतरही केले लाखोंचे दावे

उत्तरप्रदेशातील हापुडमध्ये इन्शुरन्ससाठी मुलगा विशाल सिंघलने आई-वडील व पत्नीची हत्या अपघात दाखवून केल्याचा धक्कादायक प्रकार. पोलिसांनी विशाल व साथीदाराला अटक करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 30, 2025 | 03:10 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी स्वत:च्या आई-बापाची हत्या केली आणि हि हत्या अपघात असल्याचे दाखवलं. एवढेच नाही तर त्यांने आपल्या पत्नीचाही अपघातात मृत्यू झाल्याचा दाखवला असून त्यातून देखील आरोपीने इन्शुरन्सचे पैसे मिळवले असल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला आणि त्याचा साथीदाराला अटक केली असून त्याचा तपास सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव विशाल सिंघल असे आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील हापुड येथील असल्याचे समोर आले आहे.

Karnatak Crime : लग्नाला दोन वर्षेही पूर्ण नाही आणि…, आधी पत्नीची हत्या नंतर गळफास घेत आत्महत्या

नेमकं काय प्रकरण?

हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी संजय कुमार यांनी सांगितले की, मृतक मुकेश सिंघल यांच्या नावावर अनेक विमा पॉलिसी होत्या. त्यांचं वार्षिक उत्पन्न 12 ते 15 लाख रुपये होतं. त्यांच्या पॉलिसींमधून एकूण मिळणारा विमा सुमारे 39 कोटी रुपयांचा आहे.संजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, पॉलिसीमध्ये मुलगा विशाल कुमारने विमा दावा केला होता. त्यात नमूद केले होते की 27 मार्च 2024 रोजी गढ गंगा येथून परतताना मुकेश सिंघल यांचा अपघात झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, मेरठच्या नवजीवन रुग्णालयाच्या रेकॉर्डनुसार अपघात रात्री झाला होता आणि त्यानंतर आनंद रुग्णालयात त्यांचा मृत्यू दाखवला गेला होता.

संजय कुमार म्हणाले की, मृतकाच्या मुलाने अपघाताचे कारण सांगितले असले तरी पोस्टमॉर्टम अहवालातील जखमा आणि मुलाने सांगितलेल्या जखमा यांचा मेळ बसत नाही. त्यामुळे हे सर्व प्रकरण हत्या आणि फसवणुकीचे असल्याचा संशय आहे. विशाल सिंघल याने तपासादरम्यान विमा कंपनीच्या टीमला सहकार्य केले नाही आणि महत्त्वाचे कागदपत्र दिले नाहीत. एवढेच नाही तर कंपनीच्या एका अधिकाऱ्याला काम लवकर पूर्ण करण्यासाठी लाच देण्याचाही प्रयत्न केला. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब घेतले असता हेही समोर आले की त्यांनाही लाच देण्यात आली होती.

पत्नीच्या मृत्यालाही दाखवले कटकारस्थान

हापुड पोलिसांच्या माहितीनुसार, 21 जून 2017 रोजी विशालची आई प्रभा देवी हिचा पिलखुवा येथे रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. प्रभा देवी त्या वेळी विशालसोबत बाईकवर होत्या आणि त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे दाखवून सरस्वती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. प्रभा देवीच्या मृत्यूनंतर विशालला विमा कंपन्यांकडून सुमारे 80 लाख रुपये मिळाले होते. आता विमा कंपनीने या प्रकरणालाही कटकारस्थान मानले आहे. इतकेच नव्हे तर विशालच्या पत्नीचाही मृत्यू झाला असून त्यासाठी त्याला 30 लाख रुपये विमा मिळाला आहे.

तपास सुरु

हापुडचे सीओ सिटी वरुण मिश्रा यांनी सांगितले की, आरोपांच्या आधारे तपास करताना मेरठच्या गंगानगरचा रहिवासी विशाल सिंघल आणि त्याचा मोहनपुरीतील मित्र सतीश कुमार यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

20 हजारांची लाच घेणं भोवलं; सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

 

Web Title: Uttar pradesh son hatches conspiracy to get insurance of rs 39 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • crime
  • Uttar Pradesh
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

Karnatak Crime: 39 वर्षीय महिला होमगार्डवर निर्जन ठिकाणी 4 जणांकडून सामूहिक बलात्कार, आधी फसवून दारू पाजली नंतर…
1

Karnatak Crime: 39 वर्षीय महिला होमगार्डवर निर्जन ठिकाणी 4 जणांकडून सामूहिक बलात्कार, आधी फसवून दारू पाजली नंतर…

Thane Crime: डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा उघडकीस! गुन्हे शाखेची छापेमारी; निवडणुकी आधी खळबळ
2

Thane Crime: डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा उघडकीस! गुन्हे शाखेची छापेमारी; निवडणुकी आधी खळबळ

Naxalite Hidma Killed : टॉप नक्षल कमांडर हिडमा ठार, ४५ लाखांचे बक्षीस, सुकमा चकमकीत सहा नक्षलवादी ठार
3

Naxalite Hidma Killed : टॉप नक्षल कमांडर हिडमा ठार, ४५ लाखांचे बक्षीस, सुकमा चकमकीत सहा नक्षलवादी ठार

Thane Crime: अंबरनाथमध्ये दहशत! फुलेनगरमध्ये 8-9 जणांचा तलवार–कोयत्यांनी तरुणावर प्राणघातक हल्ला; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
4

Thane Crime: अंबरनाथमध्ये दहशत! फुलेनगरमध्ये 8-9 जणांचा तलवार–कोयत्यांनी तरुणावर प्राणघातक हल्ला; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.