Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: शिक्षण विभाग हादरला! महिला शिक्षिकेची प्रिन्सिपल रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या, छळाचे गंभीर आरोप

हरख विकासखंडातील उदवापूर कंपोजिट स्कूलमध्ये महिला शिक्षिकेने शाळेतील प्रिन्सिपल रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सहकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्याचे गंभीर आरोप कुटुंबीयांनी केले असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 19, 2026 | 03:01 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • उदवापूर कंपोजिट स्कूलमध्ये सहाय्यक शिक्षिकेची शाळेच्या आवारात आत्महत्या
  • पती व भावाने सहकाऱ्यांकडून अडीच वर्षे मानसिक छळ झाल्याचा आरोप
  • खोलीचा दरवाजा आतून बंद नव्हता; मृत्यूवर संशय व्यक्त करत चौकशीची मागणी
उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला शिक्षिकेने प्रिन्सिपल रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी हरख विकासखंड अंतर्गत येणाऱ्या उदवापूर कंपोजिट स्कूलमध्ये घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. शिक्षिकेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहे. एका शिक्षिकेने शाळेच्या आवारातच इतकं टोकाचं पाऊल का उचलले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Gadchiroli Crime: बेपत्ता आरडी एजंटचा जंगलात निर्घृण अवस्थेत मृतदेह; हाताचे बोट छाटलेले….

पतीने केले गंभीर आरोप

मृत महिला शिक्षिका या शाळेत सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. तर शिक्षिकेचा पती देखील शिक्षण विभागातच दुसऱ्या एका शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या दाम्पत्याला २ मुले आहेत. याप्रकरणात मृत शिक्षिकेच्या पतीने शाळेतील इतर स्टाफवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून शाळेतील काही कर्मचारी त्यांच्या पत्नीला सतत मानसिक त्रास देत होते. जेव्हा त्या मनापासून विद्यार्थ्यांना शिकवायच्या, तेव्हा इतर कर्मचारी त्यांच्यावर टोकाची टीका-टिप्पणी करायचे. या त्रासामुळे त्या बदलीसाठी प्रयत्न करत होत्या, मात्र त्यात यश मिळाले नाही, असे त्यांच्या पतीने सांगितले आहे.

घटनेच्या दिवशीच फोनवर झाला बोलणं

घटनेच्या दिवशी सकाळी 10.30 च्या सुमारास मृत शिक्षिकेच तिच्या पतीशी बोलणं झालं होता. तेव्हा त्या फारशा चिंतेत वाटत नव्हत्या, असं पतीने नमूद केलं आहे. शाळेतील सहकाऱ्यांनी त्यांना लटकलेल्या अवस्थेत पाहिलं असूनही वेळेवर हॉस्पिटलमध्ये का नेलं नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर वेळीच मदत मिळाली असती, तर कदाचित आज त्यांची पत्नी जिवंत असती, अशी खंत पतीने व्यक्त केली आहे.

आतून दरवाजा बंद नव्हता…

मृत महिलेच्या भावाने या प्रकरणात मोठा दावा केला आहे. ज्या खोलीत फाशी घेतली, त्या खोलीचा दरवाजा आतून बंद नव्हता, असा दावा त्यांनी केला असून शाळेतील काही शिक्षकांची नावे घेत त्यांना जबाबदार धरले आहे. “मोठी शिकवणारी आली, हिला काय अवॉर्ड हवाय का?” अशा शब्दांत इतर कर्मचारी त्यांची छेड काढत असत, असा आरोप कुटुंबाने केला आहे. गेल्या अडीच वर्षापासून तिचा छळ सुरू होता, अशी माहिती मिळाली आहे. या मृत्यूबाबत मृत महिला शिक्षिकेच्या भावाने संशय व्यक्त केला आहे. त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

शिक्षण विभागात मोठी खळबळ

या घटनेने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. सतरिख पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

भंगाराच्या पैशावरून वाद, पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिक्षिकेने आत्महत्या कुठे केली?

    Ans: शाळेतील प्रिन्सिपल रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • Que: कुटुंबीयांनी काय आरोप केले आहेत?

    Ans: शाळेतील काही कर्मचारी मानसिक छळ करत होते, बदलीसाठी अडथळे आणले जात होते, असा आरोप आहे.

  • Que: पोलीस तपासात काय सुरू आहे?

    Ans: मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून आत्महत्या की इतर काही, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

Web Title: Uttarpradesh crime a female teacher committed suicide by hanging herself in the principals room

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.