Goa Crime: गोव्यात सिरीयल किलरचा थरार! 15 महिलांना मोक्ष दिल्याची धक्कादायक कबुली, दोन हत्याकांड उघड
काय प्रकरण नेमकं?
आरोपीचे नाव रामसिंह असे आहे. याची आधीच दोन लग्न झाली होती. मात्र तो प्रीती नावाच्या महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. प्रीती सातत्याने रामसिंहकडे पैशांची मागणी करत होती आणि आतापर्यंत तिने त्याच्याकडून लाखो रुपये घेतले होते. या सततच्या त्रासाला कंटाळून रामसिंहने तिचा काटा काढण्याचा ठरवला. हत्या केल्यांनतर त्याने मृतदेह एका निळ्या रंगाच्या पेटीत ठेवून जाळला. मृतदेहाची राख त्याने नदीत वाहून टाकली. आणि शिल्लक राहिलेली हाडे आणि कोळसा त्याच पेटीत भरला. त्यानंतर त्याने आपल्या मुलाच्या मदतीने ही पेटी एका लोडर गाडीतून आपली दुसरी पत्नी गीता हिच्या घरी पाठवून दिली.
लोडर चालकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला प्रकरण
लोडर चालकाने आरोपचीच्या दुसऱ्या पत्नीच्या घरी पेटी सुपूर्द केली. मात्र त्याला या पेटीबद्दल संशय आला. त्याने शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री झाशी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केले. त्याने पेटीबद्दल संशय असल्याचं पोलिसांजवळ व्यक्त केले. पोलिसांनी तातडीने घटनसाठाळी धाव घेतली. गीता नावाच्या महिलेच्या घरातून ती पेटी जप्त केली. पेटी उघडताच पोलिसही चक्रावून गेले. त्यात मानवी हाडांचे अवशेष आणि कोळसा आढळून आला. फॉरेन्सिक टीमने तपासणी केल्यानंतर ते अवशेष मानवी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
आरोपींना अटक
पोलिसांनी आरोपी रामसिंहचा मुलगा नितीन याच्यासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.मुख्य आरोपी रामसिंह सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लोडर चालक जयपाल याने सांगितले की, ४०० रुपयांत गाडी भाड्याने ठरवून ही पेटी वाहून नेण्यात येत होती, मात्र संशय आल्याने त्याने पोलिसांना कळवलं…
Beed Crime: बीड हादरलं! GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमुळे खळबळ
Ans: उत्तर प्रदेशातील झाशी येथे ही धक्कादायक घटना घडली.
Ans: लोखंडी पेटी वाहून नेताना लोडर चालकाला संशय आल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली.
Ans: मुख्य आरोपी रामसिंह फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.






