Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: घटस्फोटासाठी दबाव टाकणाऱ्या आई-वडिलांची केली निर्घृण हत्या; लोखंडी रॉडने वार, करवतीने तुकडे करून नदीत फेकले

उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये इंजिनियर मुलाने घटस्फोटाच्या वादातून आई-वडिलांची हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून गोमती नदीत फेकले. बहिणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत प्रकरण उघड केले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 18, 2025 | 12:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • इंजिनियर अंबेशने लोखंडी रॉडने आई-वडिलांची हत्या
  • मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरून गोमती नदीत टाकले
  • बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथील जौनपूरमधून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. मुलानेच आई- वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने आधी लोखंडी रोडने हत्या केली, त्यांनतर मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि हे तुकडे एका गोणीत भरून गोमती नदीत फेकून दिले. एव्हडेच नाही तर त्यांने बहिणीला हत्या केल्यानंतर सांगितलं आई-बाबा रागावून कुठे तरी निघून गेले. बहिणीने जाफराबाद पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

Dhule Crime: वृद्धेचा अमानुष खून आणि घटनास्थळी राहिलेलं घड्याळ; 24 तासांत उलगडलं खुनाचं कोडं

काय नेमकं प्रकरण?

आरोपी मुलाचं नाव अंबेश आहे. त्याचे वडील श्यामबहादूर (६२), पत्नी बबिता (६०) सोबत अहमदपूरजवळ नवीन घर बांधत होते. जून महिन्यात ते रेल्वेतून निवृत्त झाले होते. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. अंबेशचं बीटेक पूर्ण झालं होते. पाच वर्षांपूर्वी त्याने एका मुस्लीम मुलीसोबत लग्न केलं होतं. मुलगी ही ब्युटी पार्लर चालवत होती. या लग्नाला अंबेशच्या कुटुंबाचा विरोध होता. त्यामुळे लग्नानंतर अंबेशची पत्नी सासरी येऊ शकत नव्हती. या लग्नावरुन घरात वारंवार वाद होत होता.

लग्नानंतर अंबेशला दोन मुलं झाली होती. मात्र तरीही अंबेशच्या कुटुंबाने तिचा स्वीकारल नाही. अंबेशचे वडील त्याला घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकत होते. अंबेशने हा सगळा प्रकरण आपल्या पत्नीला सांगितलं. शेवटी तिनेही पोटगी देऊन नात्याचा शेवट करण्यास सहमती दिली. तिने ५ लाख पोटगी साठी मागितले होते.

पैसे देण्यास नकार आणि…

८ डिसेंबरला अंबेश वडिलांकडे पैसे मागण्यासाठी गेला होता. मात्र वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. याच दरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि हा वाद एवढा विकोपाला गेला की त्याने आईला मारहाण केली. याचदरम्यान रागाच्या भरात अंबेशने शेजारी ठेवलेल्या लोखंड्याच्या रॉडने आईच्या डोक्यावर वार केला. आई खाली कोसळली आणि तडफडू लागली. हे बघताच त्याच्या वडील घाबरले आणि त्यांनी कोणाला तरी कॉल केला. घडलेला प्रकार ते कॉलवर सांगणार तेव्हड्यात अंबेशने वडिलांच्या डोक्यावरही वार केला. यानंतर तेही खाली कोसळले. काही वेळाने अंबेशचे आई-वडिल दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला.

गोण्या लहान पडल्या म्हणून केले तुकडे

मृत्यूनंतर अंबेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घराखाली गॅरेजमधील रिकाम्या सिमेंटच्या गोण्या आणल्या मात्र या गोण्या लहान होत्या. त्यामुळे त्याने करवतीने आई- वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे केले. आधी डोकं वेगळं केलं, त्यानंतर कंबरेपर्यंतचा भाग, कंबरेपासून गुडघ्यापर्यंत भाग कापला. शेवटी गुडघ्यापासून पंजापर्यंत भाग वेगळा केला. हे सर्व तुकडे गोणीत भरले आणि गाडीच्या डिक्कीत ठेवले. त्यांनतर दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण पहाटे पाच वाजता सुमारास अंधारात कार घेऊन बेलाव पुलावरुन मृतदेह नदीत फेकला. यानंतर तो घरी निघून गेला.

अंबेशने बहिणींना सांगितली वेगळीच कहाणी

बहिणींनी जेव्हा आई- वडिलांबद्दल विचारलं तेव्हा अंबेशने वेगळीच कहाणी सांगितली. आई-वडील रागाने कुठे तरी निघून गेले आहेत मी त्यांना शोधायला जात असल्याचे त्यांने सांगितले आणि गायब झाला. यांनतर बहिणींनी १३ डिसेंबरला पोलिसात तक्रार केली. यावेळी तिने तिघेजण बेपत्ता असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शोध सुरु केला. १५ डिसेंबरला पोलिसांनी अंबेशला ताब्यात घेतले. त्यावेळी तो पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत होता. शेवटी पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्या तेव्हा त्याने घटनेची कबुली दिली.

Chhatrapati Sambhajinagar: जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या, कुटुंबीयांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या करण्यामागचं कारण काय होतं?

    Ans: पत्नीला घटस्फोट देण्यासाठी लागणाऱ्या पैशांवरून आणि लग्नाच्या वादातून भांडण झाले.

  • Que: आरोपीने गुन्ह्यानंतर काय केलं?

    Ans: मृतदेहाचे तुकडे करून नदीत फेकले आणि आई-वडील रागावून गेले असल्याचं सांगितलं.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

    Ans: बहिणीच्या बेपत्ता तक्रारीनंतर तपास करून पोलिसांनी अंबेशला ताब्यात घेतलं.

Web Title: Uttarpradesh crimea man brutally murdered his parents who were pressuring him for a divorce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • crime
  • Uttar Pradesh
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

Dhule Crime: वृद्धेचा अमानुष खून आणि घटनास्थळी राहिलेलं घड्याळ; 24 तासांत उलगडलं खुनाचं कोडं
1

Dhule Crime: वृद्धेचा अमानुष खून आणि घटनास्थळी राहिलेलं घड्याळ; 24 तासांत उलगडलं खुनाचं कोडं

Chhatrapati Sambhajinagar: जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या, कुटुंबीयांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि…
2

Chhatrapati Sambhajinagar: जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या, कुटुंबीयांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि…

Sangali Crime: 8 वीच्या मुलीसोबत ऊसाच्या शेतात आळीपाळीने अत्याचार, आरोपींनी विवस्त्र केले, नंतर कपडे घेऊन फरार आणि….
3

Sangali Crime: 8 वीच्या मुलीसोबत ऊसाच्या शेतात आळीपाळीने अत्याचार, आरोपींनी विवस्त्र केले, नंतर कपडे घेऊन फरार आणि….

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये अपघाताच्या नावाखाली खून! जुन्या वादातून दोन मित्रांनी 35 वर्षीय तरुणाची केली हत्या
4

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये अपघाताच्या नावाखाली खून! जुन्या वादातून दोन मित्रांनी 35 वर्षीय तरुणाची केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.