काय नेमकं प्रकरण?
मृत दादा सांहू पठाण हे मूळचे ओहरगावचे आहे. त्यांच्या घरासमोर त्यांची शेती आहे. काही अंतरावर शाळेजवळ त्यांची जमीन आहे. या जमिनीच्या शेजारून एक छोटी वाट जाते. सुरुवातीला आरोपींच्या टोळीने या छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्यांनतर कालांतराने या टोळीने ही जमीन आपली असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. या कारणावरून अनेक वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरु होता.
बुधवारी दुपारी पठाण यांनी आपल्या जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी एक जेसीबी बोलावला होता. काम सुरु असतानाच अचानक 11 जणांची टोळी तिथे आली आणि त्यांनी कामाला विरोध करण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. टोळीने हल्ला चढवला, तेव्हा पठाण यांच्या कुटुंबातील महिलांनी हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनंती केली. मात्र हल्लेखोर काही थांबले नाही. हल्लेखोर यांनी दादा पठाण आणि त्यांच्या दोन मुलांवर लाठ्याकाठ्या, रॉड आणि लाथाबुक्क्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात दादा पठाण यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
टोळीविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान, अस्लम गयाज पठाण ऊर्फ गुड्डू, हैदर खान गयाज खान पठाण, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, रामअवतार सागरमल साबू, मोईन इनायत खान पठाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव आहे. एका आरोपीला बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणातील इतर सर्व आरोपी पसार असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
Ans: छत्रपती संभाजीनगर शहरातील जटवाडा रस्ता परिसरात.
Ans: जमिनीच्या जुन्या वादातून वाद विकोपाला जाऊन हत्या झाली.
Ans: 11 जणांविरोधात गुन्हा दाखल; एक अटक, इतर फरार आरोपींचा शोध सुरू.






