Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! सासरच्या जाचाला कंटाळून ‘भक्ती’ ने संपवल जीवन

पुण्यातील वैष्णवी नंतर आता नाशिकच्या भक्तीने आपलं आयुष्य संपवलं आहे. सासरच्या जाचाला कंटाळून भक्तीने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. भक्तीचा पती फरार आहे. दोघांना ५ वर्षाचा मुलगा आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 24, 2025 | 01:07 PM
crime (फोटो सौजन्य : social media)

crime (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील नवं नवीन खुलासे समोर येत आहे. आता हा प्रकरण ताज असतांना नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर येथे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार अपघातानंतर महिलेला जखमी अवस्थेत गेला घरी घेऊन अन्…..क्षणातच होत्याचं नव्हतं झालं; पीडितेने सांगितला भयानक अनुभव

भक्ती अथर्व गुजराथी (37) असे आत्महत्या केलेल्या महिलेचा नाव आहे. तिच्या पतीचा नाव अथर्व योगेश गुजराथी (40) असे आहे. या दोघांना ५ वर्षाचा मुलगा आहे. अथर्व गुजराथी हा फरार आहे. भक्तीने घरातील जाचाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तिची सासू, सासरे, पती, नणंद ही सासरची मंडळी तिला त्रास देत होती, असा आरोप तिच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी केला आहे. या आत्महत्येप्रकरणी नातेवाईकांनी शंका व्यक्त करत गंगापूर पोलीस ठाणे गाठले. आपली कैफियत मांडत भक्तीला न्याय द्या, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भक्ती अथर्व गुजराती यांचे वडील दिलीप प्रभाकर माडीवाले हे व्यवसायने सराफी आहेत. आपल्या मुलीने आत्महत्या केली असे कळताच त्यांनी नाशिक येथे येऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. भक्ती गुजराथी यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी भक्तीचा फरार पती अथर्व गुजराती यास लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. घटनेचा अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहे.

भक्तीच्या अंत्ययात्रेत झळकले फलक

यानंतर पोलिसांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर भक्तीवर तिच्या माहेरी येवला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारावेळी संतप्त नातेवाईक व येवलेकर नागरिकांनी निषेध व्यक्त करणारे तसेच भक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना त्वरित अटक झालीच पाहिजे, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अटक करा, अटक करा, दोषींना अटक करा, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, अशा आशयाचे फलक अंत्ययात्रेत झळकवत न्यायासाठी टाहो फोडला.

भक्तीला न्याय मिळेल का?
भक्तीने हा टोकाचा पाऊल का उचलला? मृत भक्ती यांना सासरच्यांनी मारहाण केली की पैशांचा तगादा लावला? याचा तपस पोलिसांकडून करण्यात येत आहे. मृत भक्तीचा पती अथर्व गुजराथी हा फरार आहे. आता भक्तीला न्याय मिळेल का? आता हे पाहून महत्वाचे ठरणार आहे.

टेंभुर्णीत धक्कादायक प्रकार उघडकीस; विवाहितेला विष पाजण्याचा प्रयत्न करून रॉडने बेदम मारहाण

Web Title: Vaishnavi hagavane case repeated tired of her in laws oppression bhakti ends her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • crime
  • Nashik Crime
  • Nashik News

संबंधित बातम्या

प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले ४ मृतदेह आढळले, टिकटॉक स्टारचे काय झाले? संपूर्ण कहाणी जाणून घ्या…
1

प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले ४ मृतदेह आढळले, टिकटॉक स्टारचे काय झाले? संपूर्ण कहाणी जाणून घ्या…

बाबो! 2 मुलांची आई 17 वर्षीय मुलाच्या प्रेमात झाली वेडी, दोघेही फरार; आता महिलेवर लागू होणार POCSO कायदा
2

बाबो! 2 मुलांची आई 17 वर्षीय मुलाच्या प्रेमात झाली वेडी, दोघेही फरार; आता महिलेवर लागू होणार POCSO कायदा

Kolhapur Crime: धक्कदायक! प्रेमविवाह केला म्हणून सेवानिवृत्त सैनिकाने बहिणीच्या नवऱ्यावर झाडली गोळी; कोल्हापुरातील घटना
3

Kolhapur Crime: धक्कदायक! प्रेमविवाह केला म्हणून सेवानिवृत्त सैनिकाने बहिणीच्या नवऱ्यावर झाडली गोळी; कोल्हापुरातील घटना

Ullasnagar crime: दरोडेखोरांनी रिक्षातून जाणाऱ्या तरुणाला लुटलं, रिक्षाचालकाला चाकू दाखवत स्टेशनकडे केले पलायन; उल्लासनगरातील घटना
4

Ullasnagar crime: दरोडेखोरांनी रिक्षातून जाणाऱ्या तरुणाला लुटलं, रिक्षाचालकाला चाकू दाखवत स्टेशनकडे केले पलायन; उल्लासनगरातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.