हॉर्न का वाजवला म्हणून जाब विचारल्याने दोघांवर कोयत्याने वार; आधी शिवीगाळ केली अन् नंतर... (संग्रहित फोटो)
टेंभुर्णी : वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेच्या आत्महत्येनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता टेंभुर्णीतही असाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आले. याठिकाणी ‘थांब, तुझी जिरवतो’ असे म्हणून दोन दीर व जावांनी ३८ वर्षीय विवाहितेला काठी-रॉडने मांडीवर, पाठीवर, पायावर, हातावर अमानुष मारहाण केली. तसेच घरात कोंडून विष पिण्यासाठी जबरदस्ती केली. याप्रकरणी टेंभुर्णी (ता.माढा) येथील पेशाने वकील असलेल्या दीर व दोन जावासह चौघांवर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
टेंभुर्णी (ता.माढा) येथील चित्रा सतिश भोसले (वय ३७) या 11 मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वयंपाक खोलीत काम करत असताना दीर संतोष भोसले, निलेश भोसले, जाऊ निलीता संतोष भोसले, पूजा निलेश भोसले यांनी घराच्या हॉलमध्ये आणले. तेव्हा आरोपींकडून शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर दीर संतोष लक्ष्मण भोसले यानेही विवाहितेला धमकी देत मारहाण केली. त्यानंतर दोन्ही जाऊ निलिता संतोष भोसले, पूजा निलेश भोसले यांनीही लाकडी काठ्यांनी मांडीवर, पाठीवर, पायावर, हातावर मारून जखमी केले.
तसेच दोन्ही जावांनी हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी दीर ॲडव्होकेट निलेश याने ‘तू घराची अब्रू घालवतेस, तुझा काही उपयोग नाही. तू विष पिऊन मर’, असे म्हणून मारहाण केली. घरामध्ये डांबून ठेवले. यामध्ये कानाचा पडदा फाटला आहे, अशी फिर्याद दिली. याप्रकरणी दीर ॲड. निलेश भोसले संतोष भोसले, जाऊ निलीता संतोष भोसले, पूजा निलेश भोसले यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हगवणे कुटुंबावर कारवाईचा फार्स
पुण्यात वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर हगवणे कुटुंबावर कारवाईचा फार्स आवळला जात असून, पोलिसांनी बुधवारी हुंड्यात दिलेली फॉर्च्यूनर कार आणि अॅक्टिव्हा गाडी जप्त केली आहे. पोलिसांनी मुळशीतील घरी जाऊन कारवाई केली. वैष्णवीला नेमका काय जाच झाला हे तिने एका मैत्रिणीकडे सांगितले होते, त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये, तिने सासरच्यांनी जाच केल्याचे म्हटले आहे.