Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेदांत बंडगर खूनप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी; सोमवारपासून हमाल-माथाडी कामगारांचा संप

सांगलीतील वेदांत बंडगर खूनप्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी जोर धरत आहे. हमाल-माथाडी कामगार संघटनांनी तपासावर राजकीय दबाव असल्याचा आरोप करत सोमवारपासून संप आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 18, 2026 | 07:27 PM
वेदांत बंडगर खूनप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी; सोमवारपासून हमाल-माथाडी कामगारांचा संप

वेदांत बंडगर खूनप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी; सोमवारपासून हमाल-माथाडी कामगारांचा संप

Follow Us
Follow Us:
  • वेदांत बंडगर खूनप्रकरणातील तपासावर राजकीय दबाव असल्याचा गंभीर आरोप
  • संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशीची हमाल-माथाडी कामगार संघटनांची मागणी
  • पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यावरही गंभीर आरोप
सांगली : वेदांत बंडगर खूनप्रकरणातील तपासावर राजकीय दबाव असल्याचा गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करावी, अशी मागणी हमाल-माथाडी कामगार संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी सोमवारपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून त्यात हमाल, तोलाईदार, महिला कामगार आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.

यासंदर्भात मुख्यमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक यांच्याकडेही निवेदन देऊन स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला हमाल नेते विकास मगदूम, रामचंद्र बंडगर, खंडू सोनू, बाळासाहेब बंडगर, मारुती बंडगर, पृथ्वीराज पवार आणि बजरंग मोहिते उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना पदाधिकाऱ्यांनी वेदांत बंडगर हत्येपूर्वी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ९ जूनपासून सुरू झालेल्या वादानंतर १० जून रोजी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या बंडगर कुटुंबीयांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. उलट पोलीस ठाण्यातच धमक्या दिल्या जात असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला.

गे डेटिंग अ‍ॅप ठरलं सापळा! भेटायला बोलावलं, निर्जन खोलीत 7 जण वाट पाहत होते; पुढे जे घडलं ते धक्कादायक

यावेळी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले. निलेश गडदे यांच्याकडून धमक्या दिल्या जात असताना कोळेकर घटनास्थळी उपस्थित होते. मात्र त्यांनी कारवाई करण्याऐवजी बंडगर कुटुंबीयांनाच अपमानास्पद वागणूक दिली. तक्रार तत्काळ नोंदवून घेतली नाही. या काळात त्यांना येणारे दूरध्वनी आणि काही राजकीय नेत्यांशी झालेल्या संभाषणांची चौकशी व्हावी. या प्रकरणामागे कार्यरत असलेल्या ‘राजकीय अदृश्य शक्ती’चा शोध घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.संदीप कोळेकर यांचे निलंबन करून त्यांची चौकशी करावी, यापूर्वी देखील त्यांनी काही प्रकरणात असंवेदनशीलपणा दाखवला आहे, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी पृथ्वीराज पवार यांनी केली.

पोलीस ठाण्यात निलेश गडदे व त्यांच्या समर्थकांकडून उघडपणे धमक्या दिल्या जात होत्या. त्यावेळी बाळासाहेब बंडगर यांना दूरध्वनीवरूनही जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना असूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच आतापर्यंत पोलीस खात्याकडून केवळ औपचारिकता पार पाडली आहे.

वेदांत बंडगर हत्येतील सर्व संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, तपासातील प्रत्येक संशयित भूमिकेची चौकशी करावी आणि संपूर्ण प्रकरण एसआयटीकडे सोपवावे, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारपासून आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनांच्या वतीने जाहीर करण्यात आले.

‘माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांचा विनाश होईल…’ १०१ दिवसांनी दलित तरुणावर अंत्यसंस्कार, आईचा आक्रोश, प्रकरण काय?

हमालीच्या वर्चस्वातून निर्माण झाला वाद

या प्रकरणातील मूळ कारण आरग रेल्वे मालधक्का परिसरातील हमालीच्या कामावरील नियंत्रण असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. लक्ष्मण खरात हा मुकादम असून जी. व्ही. आलोलकर या आस्थापनेच्या वतीने तेथे हमालीचे काम चालते. या ठिकाणी सुमारे १०४ माथाडी व हमाल कामगार कार्यरत आहेत. या हमालीवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नातूनच संपूर्ण संघर्ष निर्माण झाला आणि त्यातून वेदांत बंडगर या निष्पाप मुलाचा बळी गेला, असा आरोप करण्यात आला.

या घटनेमुळे असंघटित कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. “आज वेदांत गेला, उद्या कोण?” असा सवाल उपस्थित करत कामगारांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे विकास मगदूम यांनी सांगितले.

Web Title: Vedant bandgar murder case sit probe demand hamal mathadi workers strike sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • Sangli Crime
  • sangli news
  • SIT investigation

संबंधित बातम्या

Sangli Crime: नशेत झाला वाद अन् संपला जीव! बापानेच केली मोठ्या मुलाची हत्या; मदतीला धावला धाकटा मुलगा
1

Sangli Crime: नशेत झाला वाद अन् संपला जीव! बापानेच केली मोठ्या मुलाची हत्या; मदतीला धावला धाकटा मुलगा

वेदांत बंडगर हत्येतील सत्य बाहेर आलेच पाहिजे; अल्पवयीनावर गुन्ह्याची जबाबदारी टाकण्याचा डाव? : खासदार विशाल पाटील
2

वेदांत बंडगर हत्येतील सत्य बाहेर आलेच पाहिजे; अल्पवयीनावर गुन्ह्याची जबाबदारी टाकण्याचा डाव? : खासदार विशाल पाटील

Sangli Crime: माथाडी कामगार नेत्याच्या नातवाची निर्घृण हत्या; चार दिवसांनी मुख्य आरोपी अटकेत
3

Sangli Crime: माथाडी कामगार नेत्याच्या नातवाची निर्घृण हत्या; चार दिवसांनी मुख्य आरोपी अटकेत

सांगलीत पुन्हा गुंडाराज ! हमाल पंचायतच्या नेत्याला संपवण्याचा कट; सापडले नाहीत म्हणून थेट नातवावर गोळीबार
4

सांगलीत पुन्हा गुंडाराज ! हमाल पंचायतच्या नेत्याला संपवण्याचा कट; सापडले नाहीत म्हणून थेट नातवावर गोळीबार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.