Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गांजा विकणाऱ्या दोन महिलांना ठोकल्या बेड्या; विटा पोलीसांची मोठी कारवाई

विटा पोलिस ठाण्याच्या धडक कारवाईत साळशिंगे (ता. खानापूर) आणि मायणी (ता. खटाव, जि. सातारा) येथील दोन गांजा विक्रेत्या महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 10, 2025 | 02:49 PM
गांजा विकणाऱ्या दोन महिलांना ठोकल्या बेड्या; विटा पोलीसांची मोठी कारवाई

गांजा विकणाऱ्या दोन महिलांना ठोकल्या बेड्या; विटा पोलीसांची मोठी कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

विटा : राज्यात गांजा विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे पोलिसही अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. विटा पोलिस ठाण्याच्या धडक कारवाईत साळशिंगे (ता. खानापूर) आणि मायणी (ता. खटाव, जि. सातारा) येथील दोन गांजा विक्रेत्या महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार उत्तम माळी यांनी फिर्याद दिली आहे.

शनिवारी गस्त सुरू असताना हवालदार संभाजी सोनवणे यांना साळशिंगे मध्ये वनवासवाडी रस्त्यालगतच्या एका घराजवळ एक महिला गांजा विकत आहे, अशी माहिती मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना ही माहिती दिली. त्यावर पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे आणि उत्तम माळी पथकासह साळशिंगे येथे गेले असता एक महिला तिच्या घराच्या बाहेर सोप्यात गांजाची विक्री करताना सापडली. त्यावर तिथेच छापा टाकला असता या महिलेचे नाव हुसेनबी गुलाब शेख असल्याचे समजले.

तिला ताब्यात घेऊन तिच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्यात उग्र वासाचा ६२५ ग्रॅम तयार गांजा होता. त्यावर या पोलिस पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना त्या ठिकाणी बोलावले. त्यानंतर हुसेनबी शेख या संशयित महिलेला गांजा कोठुन आणला आहे. याबाबत अधिक विचारणा केली असता तिने तो गांजा मायणी येथील शोभा बाळकृष्ण चिवटेकडून घेतला असे सांगितले. त्यावर या पथकाने मायणी येथे जाऊन शोभा चिवटे या महिलेच्या घराची झडती घेतली असता तिथे १२ किलो २३१ ग्रॅम असा एकूण १२ किलो ८५६ ग्रॅम तयार उग्र वासाचा गांजा सापडला.

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Vita police have arrested two women who were selling ganja nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड! खात्यात जमा होणार ४५०० रुपये; ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ होण्याची शक्यता 
1

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड! खात्यात जमा होणार ४५०० रुपये; ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ होण्याची शक्यता 

अनेकांची घरे उद्धवस्त केली, आंदेकर कुटुंबीयाना उमेदवारी देऊ नका; आयुषच्या आईची अजित पवारांना विनंती
2

अनेकांची घरे उद्धवस्त केली, आंदेकर कुटुंबीयाना उमेदवारी देऊ नका; आयुषच्या आईची अजित पवारांना विनंती

Nashik News : धारदार नायलॉन मांजा गळ्याला अडकला अन्…, नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी, कसबे सुकेणे येथील घटना
3

Nashik News : धारदार नायलॉन मांजा गळ्याला अडकला अन्…, नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी, कसबे सुकेणे येथील घटना

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर
4

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.