Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समोर अचानक वाहन आले अन्…! वाई-सातारा मार्गावर ‘त्या’ भीषण Accident चा थरार, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव मूळ गावी हिंगोली येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलीस यंत्रणेने हाती घेतले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 19, 2026 | 08:55 PM
समोर अचानक वाहन आले अन्…! वाई-सातारा मार्गावर ‘त्या’ भीषण Accident चा थरार,  पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

वाई-सातारा मार्गावर झाला भीषण अपघात
पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा दुर्दैवी मृत्यू
अपघातात राठोड यांची पत्नी गंभीर जखमी

सातारा: वाई-सातारा मार्गावरील बावधन-वाकेश्वर परिसरात शुक्रवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातात वाई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राठोड हे कौटुंबिक कारणास्तव रात्री उशिरा पत्नीसह कारने प्रवास करत होते. पहाटेच्या सुमारास बावधन-वाकेश्वर हद्दीत त्यांच्या वाहनासमोर अचानक एक वाहन आल्याने अपघात टाळण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन रस्त्यालगत असलेल्या झाडावर जोरात आदळले.

बाबा बोलवतायेत, बाळा उठ ना… Iskon मंदिरात दुर्घटना, विजेच्या झटक्याने बापासमोरच गेला मुलाचा जीव; हृदयद्रावक Video Viral

धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात श्रावण राठोड यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नींनाही गंभीर मार लागला असून त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. श्रावण राठोड हे वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत होते. गुन्ह्यांच्या तपासात त्यांची कामगिरी उल्लेखनीय मानली जात होती. कर्तव्यनिष्ठ आणि सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या राठोड यांच्या निधनाची बातमी समजताच पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली.

सकाळी त्यांचे पार्थिव वाई पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून अखेरचा निरोप दिला. शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कारासाठी त्यांचे पार्थिव मूळ गावी हिंगोली येथे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलीस यंत्रणेने हाती घेतले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

‘जीव महत्त्वाचा, शॉर्टकट नको’; अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्गावर ‘झिरो डेथ’ अभियान, अपघात रोखण्यासाठी पोलिसांची मानवी साखळी

विजेच्या झटक्याने बापासमोरच गेला मुलाचा जीव

उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध इस्काॅन मंदिरात एक दु:खद घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मडियावर शेअर करण्यात आला आहे. माहितीनुसार, कूलरजवळ असताना तरुणाला अचानक विजेचा झटका लागला आणि काही क्षणातच होरपळत त्याचा मृत्यू झाला. मुलाचे वय अवघे २१ वर्षे होते. यावेळी त्याचे वडिल देखील त्याच्यासोबत मंदिराच्या आवारात उपस्थित होते. वडिलांनी मुलाला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण मुलगा उठलाच नाही. मुलाच्या अशा अचानक मृत्यूने वडिल खचले. ते मुलाला वारंवार शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते जे पाहून आता यूजर्सच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. या भावूक क्षणांचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात आहे.

Web Title: Wai satara highway big accident police constable death and his wife injured satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • Bangladesh Cricket Team
  • T20 series

संबंधित बातम्या

झिम्बाब्वेचा सुपडासाफ! Travis Head ने ठोकले खणखणीत शतक; 75 बॉल्समध्ये थेट…
1

झिम्बाब्वेचा सुपडासाफ! Travis Head ने ठोकले खणखणीत शतक; 75 बॉल्समध्ये थेट…

Asian Games 2026: ना टॉस, ना सामना! बांग्लादेश थेट सेमीफायनलमध्ये; चीनचं आव्हान संपलं
2

Asian Games 2026: ना टॉस, ना सामना! बांग्लादेश थेट सेमीफायनलमध्ये; चीनचं आव्हान संपलं

IND Vs AFG: रेड्डीने पठाणांना अक्षरश: झोपवलं! भारताला सिरिज जिंकण्यासाठी 160 रन्सची आवश्यकता
3

IND Vs AFG: रेड्डीने पठाणांना अक्षरश: झोपवलं! भारताला सिरिज जिंकण्यासाठी 160 रन्सची आवश्यकता

Cricket News: David Warner ची पुन्हा मैदानात एन्ट्री;  नेपाळच्या टी-२० लीगमध्ये खेळणार! काठमांडू गोर्खाजसोबत डील फायनल
4

Cricket News: David Warner ची पुन्हा मैदानात एन्ट्री; नेपाळच्या टी-२० लीगमध्ये खेळणार! काठमांडू गोर्खाजसोबत डील फायनल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.