Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य

मध्यरात्री रेल्वे स्थानकावर उतरलेल्या १९ वर्षीय तरुणीच्या प्रवासाचा शेवट धक्कादायक घटनेत झाला. रिक्षातून पुढे जात असताना घडलेल्या प्रकाराने वर्धा हादरले असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 25, 2026 | 03:25 PM
Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूरहून परतलेल्या १९ वर्षीय तरुणीवर वर्ध्यात सामूहिक अत्याचाराचा आरोप
  • रिक्षातून नेल्यानंतर आरोपींनी तरुणीवर अत्याचार केल्याची तक्रार
  • तरुणीने ओळख पटवल्यानंतर पोलिसांकडून पाच आरोपींना अटक
वर्धा: चंद्रपूरहून नागपूरकडे परतणाऱ्या १९ वर्षीय तरुणीवर वर्धा रेल्वे स्थानक परिसरात सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पीडित तरुणीने संशयितांची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. २२ सप्टेंबर रोजी ती चंद्रपूरला गेली होती. वडिलांनी तिला सोनेगाव येथील बसस्थानकावर सोडल्यानंतर ती बसने चंद्रपूरला गेली.

हेही वाचा: Thane Crime: ठाण्यात गस्तीवरील पोलिस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; उपनिरीक्षक किसन भोईर यांचा मृत्यू

रेल्वेने सुरू केला परतीचा प्रवास

२३ सप्टेंबर रोजी तरुणी चंद्रपूरहून जयंती एक्स्प्रेसने परतीच्या प्रवासाला निघाली. ती सेवाग्राम रेल्वे स्थानकावर उतरली. त्यावेळी रात्री बराच उशीर झाला होता. सेवाग्रामहून वर्धा रेल्वे स्थानक परिसरात जाण्यासाठी तिने रिक्षा घेतली. वर्धा रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर एका रिक्षाचालकाने तिला पुन्हा रिक्षात बसवल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्याने काही साथीदारांना फोन करून बोलावले. पुढे तरुणीला एका बाजूला नेण्यात आले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.

पहाटे पोलिसांना मिळाली माहिती

गुरुवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीचा शोध सुरू केला. तिच्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

हेही वाचा:DSPच्या कथित बेनामी व्यवहारांचा पर्दाफाश; ACBच्या छाप्यात सापडलं रोख रकमेचं मोठं गुपित

शहरात फिरताना पोलिसांच्या नजरेस पडली

गुरुवारी दुपारी तरुणी शहरातील एका परिसरात पोलिसांना दिसली. पोलिसांनी तिच्याशी संवाद साधून घटनेबाबत माहिती घेतली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले. प्रकरणातील संशयितांचा शोध घेत पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर तरुणीसमोर संशयितांची ओळख पटवण्यात आली. तरुणीने पाच जणांची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

पोलिसांचा पुढील तपास सुरू

या प्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. घटनेचा संपूर्ण घटनाक्रम, आरोपींची भूमिका आणि उपलब्ध पुराव्यांची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानक परिसरात प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Wardha 19 year old woman gang rape 5 arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • central railway
  • Crime in Wardha
  • gang raped
  • wardha latest news

संबंधित बातम्या

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
1

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत
2

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.