'तुला लय मस्ती आली का?' असे म्हणत अकलूजमध्ये तरूणाला बेदम मारहाण
नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. वडिलांसोबत १६ वर्षीय मुलगी किराणा खरेदी करायला गेली. किराण्याची खरेदी देखील केली. वडील आणि मुलगी दुचाकीवरून जाताना अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला. या १६ वर्षीय अनुष्का शांताराम निमसे हीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर वडील शांताराम निमसे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Pune News : पुण्यात दुर्दैवी घटना; अंगावर झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू
अधिक माहिती अशी की, शांताराम पुंडलिक निमसे (43, रा. नांदूर, कमळवाडी, संभाजीनगर रोड) हे आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच 15 बीआर 3545) वरून मुलगी अनुष्कासोबत गुरुवारी (२२ मे) सायंकाळी कोणार्कनगर परिसरात किराणा माल खरेदीसाठी गेले होते. किराण्याच्या सामान खरेदी करून घरी परत येत असतांना जत्रा चौक, नांदूर नाका लिंक रोडवरील बेंचमार्के बिल्डिंग समोरून जात असताना मागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. या धडकेत दोघेही दुचाकीवरून खाली पडले. या जोरदार धडकेत अनुष्काचा आणि तिचे वडील शांताराम निमसे हे गंभीर जखमी झाले. धडक दिल्यानंतर चारचाकी वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या वाहनचालकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
या धडकेत जखमी झाल्यानंतर दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शांताराम निमसे यांच्या उजव्या खांद्याला, कमरेला व डोक्यास मार लागून दुखापत झाली. तर मुलगी अनुष्काच्या डोक्यास, हातास आणि दोन्ही पायांना मार लागून गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना अनुष्काचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Nagpur News: पाकिस्तानसाठी गुप्तहेरी करत होती सुनीता जामगाडे? DCP निकेतन कदम यांनी स्पष्टचं सांगितले