Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pathardi Robbery News: “पाथर्डीला जायचा रस्ता सांगा…” अन् तोंडावर बुक्की मारून ७५ वर्षीय आजींचे दागिने हिसकावले!

Pathardi Robbery News: "पाथर्डीला जायचा रस्ता सांगा..." असं म्हणत दुचाकीवरून आलेले तिघे भामटे थेट ७५ वर्षीय आजींच्या अंगावर धावून गेले! सोन्याचे वेल ओढल्याने कानाची पाळी फाटली अन् तोंडावर मारलेली बुक्की खाऊन आजींचा दातच पडला. ४३ हजारांचे दागिने घेऊन पसार झालेल्या या नराधमांच्या कृत्याने पाथर्डीत खळबळ उडाली आहे!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 05, 2026 | 12:20 PM
Pathardi Robbery News: "पाथर्डीला जायचा रस्ता सांगा..." अन् तोंडावर बुक्की मारून ७५ वर्षीय आजींचे दागिने हिसकावले!

Pathardi Robbery News: "पाथर्डीला जायचा रस्ता सांगा..." अन् तोंडावर बुक्की मारून ७५ वर्षीय आजींचे दागिने हिसकावले!

Follow Us
Follow Us:
  • शेळ्या राखणाऱ्या ७५ वर्षीय महिलेकडे तिघांनी रस्ता विचारला
  • सोन्याचे वेल ओढल्याने पाळी फाटली व बुक्की मारल्याने एक दात पडला
  • ४३,५०० रुपयांचे दागिने लंपास; नागरिकांमध्ये तीव्र संताप
Pathardi Robbery News: पाथर्डी तालुक्यात चोरी आणि जबरी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, आता चोरट्यांनी थेट वृद्ध महिलांना लक्ष करण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील चितळी शिवारात शेळ्या राखणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेसोबत अत्यंत अमानुष आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. पाथर्डीला जाण्याचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या तिघा जणांनी या वृद्धेच्या अंगावरील सोन्याचे दागिने बळकावत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत महिलेच्या कानाची पाळी फाटली असून तोंडावर बुक्की बसल्याने दातही पडला आहे.

हेही वाचा: Mumbai Local Train News: दंडाची रक्कम ऐकताच  महिलेचा संताप; टीसीला शिवीगाळ करत ओरबडले अन् थेट हाताला दाताने डसले!

नेमकी घटना कशी घडली?

प्रयाग आश्रु कोकळे (वय ७५, रा. दिंडेवाडी, चितळी शिवार) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या बुधवारी (दि. ४) दुपारी चितळी-आव्हाणा रस्त्यालगत आपल्या शेळ्या राखत होत्या. याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळ येऊन पाथर्डीला जाण्याचा रस्ता विचारला. वृद्ध महिला त्यांना अत्यंत सहजपणे रस्ता सांगत असतानाच, भामट्यांनी संधी साधून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने अचानक हिसकावण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: Cosmetic Shop Drug Racket: बाहेरून साधी ज्वेलरी, आत ड्रग्सचा बाजार! पुण्यात २२ वर्षीय तरुणीच्या कृत्याने खळबळ

कानातले ओढले, दात पाडला; ४३ हजार ५०० रुपयांचे दागिने लांबवले

चोरट्यांनी महिलेच्या कानातील सोन्याचे वेल जोरात ओढल्यामुळे त्यांच्या कानाला गंभीर दुखापत होऊन पाळी फाटली. एवढ्यावरच न थांबता एका नराधम चोरट्याने त्यांच्या तोंडावर जोरात बुक्की मारली, ज्यामुळे त्यांचा एक दातही खाली पडला. या अमानुष मारहाणीनंतर तिघेही चोरटे सुमारे ४३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन दुचाकीवरून सुसाट पसार झाले. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या जबरी चोऱ्यांना आळा कसा घालायचा, असा गंभीर सवाल पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाथर्डी तालुक्यातील चितळी शिवारात कोणती घटना घडली?

    Ans: शेळ्या राखणाऱ्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेकडे रस्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या तिघांनी मारहाण करून सोन्याचे दागिने लांबवले.

  • Que: हल्ल्यामध्ये वृद्ध महिलेला कोणती दुखापत झाली?

    Ans: चोरट्यांनी कानातील वेल ओढल्याने कानाची पाळी फाटली आणि तोंडावर बुक्की मारल्याने त्यांचा एक दात पाडण्यात आला.

  • Que: चोरट्यांनी किती रुपयांचा ऐवज लांबवला आहे?

    Ans: या घटनेत चोरट्यांनी सुमारे ४३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.

Web Title: Pathardi chitali elderly woman robbery gold ornaments stolen sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • case of robbery
  • Crime . Crime News
  • Robbery News
  • woman

संबंधित बातम्या

Mumbai Local Train News: दंडाची रक्कम ऐकताच  महिलेचा संताप; टीसीला शिवीगाळ करत ओरबडले अन् थेट हाताला दाताने डसले!
1

Mumbai Local Train News: दंडाची रक्कम ऐकताच  महिलेचा संताप; टीसीला शिवीगाळ करत ओरबडले अन् थेट हाताला दाताने डसले!

Cosmetic Shop Drug Racket: बाहेरून साधी ज्वेलरी, आत ड्रग्सचा बाजार! पुण्यात २२ वर्षीय तरुणीच्या कृत्याने खळबळ
2

Cosmetic Shop Drug Racket: बाहेरून साधी ज्वेलरी, आत ड्रग्सचा बाजार! पुण्यात २२ वर्षीय तरुणीच्या कृत्याने खळबळ

Nashik Crime News: निव्वळ अपघात की पूर्वनियोजित घातपात? ग्राहकाने प्रेसर गन उचलली अन्… नाशिकमधील त्या घटनेने पोलीस चक्रावले!
3

Nashik Crime News: निव्वळ अपघात की पूर्वनियोजित घातपात? ग्राहकाने प्रेसर गन उचलली अन्… नाशिकमधील त्या घटनेने पोलीस चक्रावले!

Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; “खटला चालवा फास्ट ट्रॅकवर”, नागरिकांचा संताप!
4

Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; “खटला चालवा फास्ट ट्रॅकवर”, नागरिकांचा संताप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.