Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Anti Corruption: ३ कोटींचे सोने अन् ५ कोटींची संपत्ती; लाचलुचपत विभागाने जळगावच्या अधिकाऱ्याची झडती घेताच उघडकीस आले…

Jalgaon Anti Corruption: अवघ्या दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या जळगावच्या जिल्हा परिषद अधिकाऱ्याच्या घरात आणि लॉकरमध्ये लपले होते कोट्यवधींचे साम्राज्य! एसीबीच्या धाडीत ५ कोटींहून अधिकची संपत्ती अन् ३ कोटींचे सोने बाहेर आल्याने अधिकारीही चक्रावले; जळगावात उडाली प्रचंड खळबळ!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 05, 2026 | 12:42 PM
Jalgaon Anti Corruption: ३ कोटींचे सोने अन् ५ कोटींची संपत्ती; लाचलुचपत विभागाने जळगावच्या अधिकाऱ्याची झडती घेताच उघडकीस आले...

Jalgaon Anti Corruption: ३ कोटींचे सोने अन् ५ कोटींची संपत्ती; लाचलुचपत विभागाने जळगावच्या अधिकाऱ्याची झडती घेताच उघडकीस आले...

Follow Us
Follow Us:
  • जळगाव जि.प. अधिकारी सतीश शिसोदे लाचेत पकडला
  • ५ कोटी १६ लाखांची बेहिशोबी मालमत्ता उघड
  • लॉकरमध्ये ३.७४ कोटींचे सोने-चांदीचे दागिने जप्त
Jalgaon Anti Corruption: मोठे पद, चांगला पगार आणि मानाची नोकरी असतानाही काही लोकांची पैशांची हाव सुटत नाही. याच मोहापोटी ते असे काही करून बसतात जे त्यांना शेवटी भलतेच महागात पडते. जळगावमधून अशीच एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्याने अवघ्या दहा हजारांच्या लाचेसाठी आपली प्रतिष्ठा आणि सर्व काही गमावले आहे. एवढेच नव्हे तर, लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर त्याच्या घर आणि बँक लॉकरची झडती घेण्यात आली, तेव्हा जे समोर आले ते पाहून अधिकाऱ्यांसह साऱ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फेडणारे घबाड बाहेर आले.

हेही वाचा: Pathardi Robbery News: “पाथर्डीला जायचा रस्ता सांगा…” अन् तोंडावर बुक्की मारून ७५ वर्षीय आजींचे दागिने हिसकावले!

नेमकी घटना काय आहे?

जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश मन्सुलाल शिसोदे असे लाच घेणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याचे नाव आहे. रस्त्याच्या १० लाखांच्या कामाच्या बिलासाठी या अधिकाऱ्याने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून सतीश शिसोदे याला १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात बेड्या ठोकल्या. या कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने शिसोदे यांच्या घराची आणि बँकेच्या लॉकरची कसून झडती घेतली.

हेही वाचा: Mumbai Local Train News: दंडाची रक्कम ऐकताच  महिलेचा संताप; टीसीला शिवीगाळ करत ओरबडले अन् थेट हाताला दाताने डसले!

५ कोटींहून अधिकची मालमत्ता उघडकीस

घराची आणि बँक लॉकरची झडती घेतली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांची अफाट मालमत्ता आढळून आली. यामध्ये आदर्शनगरमधील दोन आलिशान घरं आणि ७ लाख ९७ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय, बँक लॉकरमध्ये तब्बल ३ कोटी ७४ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. यामध्ये तब्बल २ हजार ५२४ ग्रॅम सोने, ११ हजार ६३३ ग्रॅम चांदी आणि १०१ ग्रॅम प्लॅटिनमच्या दागिन्यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी संपत्ती कशी जमवली, याबाबत आता एसीबीकडून सखोल पडताळणी केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जळगावमध्ये एसीबीच्या कारवाईत कोण पकडला गेला?

    Ans: जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश मन्सुलाल शिसोदे याला १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

  • Que: अधिकारी सतीश शिसोदे यांच्याकडे एकूण किती संपत्ती आढळली?

    Ans: एसीबीच्या झडतीत त्यांच्याकडे तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांची मालमत्ता आढळून आली आहे.

  • Que: बँक लॉकरमध्ये काय आणि कशा स्वरूपाचे घबाड सापडले?

    Ans: बँक लॉकरमध्ये ३ कोटी ७४ लाखांचे दागिने सापडले, ज्यात २,५२४ ग्रॅम सोने, ११,६३३ ग्रॅम चांदी आणि १०१ ग्रॅम प्लॅटिनमचा समावेश आहे.

Web Title: Jalgaon zilha parishad officer satish shisode acb trap crores assets sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • ACB
  • Anti Corruption Bureau
  • Crime . Crime News
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Pathardi Robbery News: “पाथर्डीला जायचा रस्ता सांगा…” अन् तोंडावर बुक्की मारून ७५ वर्षीय आजींचे दागिने हिसकावले!
1

Pathardi Robbery News: “पाथर्डीला जायचा रस्ता सांगा…” अन् तोंडावर बुक्की मारून ७५ वर्षीय आजींचे दागिने हिसकावले!

Cosmetic Shop Drug Racket: बाहेरून साधी ज्वेलरी, आत ड्रग्सचा बाजार! पुण्यात २२ वर्षीय तरुणीच्या कृत्याने खळबळ
2

Cosmetic Shop Drug Racket: बाहेरून साधी ज्वेलरी, आत ड्रग्सचा बाजार! पुण्यात २२ वर्षीय तरुणीच्या कृत्याने खळबळ

Nashik Crime News: निव्वळ अपघात की पूर्वनियोजित घातपात? ग्राहकाने प्रेसर गन उचलली अन्… नाशिकमधील त्या घटनेने पोलीस चक्रावले!
3

Nashik Crime News: निव्वळ अपघात की पूर्वनियोजित घातपात? ग्राहकाने प्रेसर गन उचलली अन्… नाशिकमधील त्या घटनेने पोलीस चक्रावले!

Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; “खटला चालवा फास्ट ट्रॅकवर”, नागरिकांचा संताप!
4

Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; “खटला चालवा फास्ट ट्रॅकवर”, नागरिकांचा संताप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.