Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: मैत्री की दुश्मनी? दुचाकी हरवली म्हणून मित्राचंच केलं फिल्मी स्टाईल अपहरण, तर अवघ्या दोन तासात पोलिसांकडून सुटका

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीच्या वादातून १२ वीच्या विद्यार्थ्याचे अपहरण. सिडको पोलिसांनी २ तासांत केली सुटका. पाहा सविस्तर काय आहे प्रकरण.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 04, 2026 | 03:16 PM
मैत्री की दुश्मनी? दुचाकी हरवली म्हणून मित्राचंच केलं फिल्मी स्टाईल अपहरण (Photo Credit - AI)

मैत्री की दुश्मनी? दुचाकी हरवली म्हणून मित्राचंच केलं फिल्मी स्टाईल अपहरण (Photo Credit - AI)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • दुचाकीच्या वादातून मित्राचे अपहरण
  • छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई
  • २ तासांत सुटका करून तिघांना ठोकल्या बेड्या
Crime News Chhatrapati Sambhajinagar: कॉलेजमधील मित्राची दुचाकी गायब केल्याच्या वादातून सात जणांनी सिडको परिसरात १७ वर्षीय मित्राचेच अपहरण केले. हा प्रकार २ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास एन-६ बजरंग चौकात घडला. विशेष म्हणजे घटनेची माहिती कळतच पोलिसांनी अवघ्या दोन तासात बाळूज परिसरातून आरोपींपैकी तिघांना बेड्या ठोकत अल्पवयीन विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली. विवेक गणेश सोनवणे (१९, रा. संजण रांजणगाव शे.पुं), पांडुरंग माधवराव सोनवणे (२१, रा. सुरेवाडी, जाधववाडी, मूळ रा. फुलंब्री) आणि रोहन सुनील ढवळे (१९, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर) अशी अटक आरोपीची नावे आहेत. त्यांना ६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले
आहेत.

कशी घडली घटना?

प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको परिसरात शुक्रवारी रात्री अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या अपहरणाने शहरात एकच खळबळ उडाली. एन-७ सिडको ग्रिव्हीज कॉलनीत राहणाऱ्या मनिषा समाधान गायकवाड यांचा मुलगा मयंक समाधान गायकवाड (१७ वर्षे ६ महिने) हा बारावीचा विद्यार्थी आहे. शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मयंकचा मित्र आर्यन अनिल नैनाव (रा. म्हसोबानगर) त्याला घरी बोलवण्यासाठी आला. मित्रासोबत बाहेर जातो, असे सांगून मयंक घराबाहेर पडला. दोघे आर्यनच्या चेतक स्कुटीवरून एन-६ भागातून बजरंग चौकाकडे जात असताना अचानक मागून आलेल्या दोघांनी मयंकचा शर्ट पकडून त्याला ओढण्यास सुरुवात केली. स्कुटी वेगात नेत असताना तोल जाऊन दोघे खाली पडले. तेवढ्यात आणखी एक तरुण धावून आला. तिघांनी मिळून मयंकला फरपटत नेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या आणखी तिघांनी मयंकला जबरदस्तीने कारमध्ये (एमएच-२०-एचएच-४६६८) कोंबले, कारमधील पाच आणि दुचाकीवरील दोघे असे एकूण सात जण मयंकला घेऊन पसार झाले, ही घटना मयंकचा मित्र आर्यन याने गायकवाड कुटुंबीयांना कळवल्यानंतर उघडकीस आली.

हे देखील वाचा: दुचाकीच्या वादातून मित्राचे अपहरण; छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई, २ तासांत सुटका करून तिघांना ठोकल्या बेड्या

उर्वरित आरोपींचा शोध सुरू..

अपहरण केलेल्या मुलाला आरोपी वाळूज परिसरात फिरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसानी वाळूज परिसर गातून अवघ्या दोन तासात मयंकची सुखरूप सुटका कैली तसेच आरोपींपैकी तिघांना बेड्या ठोकल्या, तर उर्वरित आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली,

कॉलेजमधील मित्रांच्या वादातून घडला प्रकार

तपासात धक्कादायक बाब समोर आली असून कॉलेजमधील मित्रांच्या एका ग्रुपमधील वादातून है अपहरण घडले, चार-पाव महिन्यांपूर्वी आरोपी रोहन ढवळे याची दुचाकी मंयक याला दिली होती. त्याने ती दुचाकी यश नावाच्या मित्राला दिली. मात्र, यशने ती दुचाकी गायब केली. रोहनच्या वडिलांनी दुचाकी कोठे आहे अशी वारंवार विचारणा करुन तगादा लावल्यानंतर आरोपी मुलांनी कट रचला. त्यानुसार, मयंक गायकवाड याचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले.

हे देखील वाचा: सख्खा भाऊ बनला पक्का वैरी; शेतात पेटवलेल्या कांद्याचा जाब विचारल्याने लोखंडी वस्तूने मारहाण

Web Title: When his motorcycle went missing he kidnapped his friend in a filmy style

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगर मनपा रणांगण; कोणाला मिळाली ‘शिट्टी’ तर कोणाला ‘बासरी’? पाहा अपक्षांच्या चिन्हांची संपूर्ण यादी!
1

छत्रपती संभाजीनगर मनपा रणांगण; कोणाला मिळाली ‘शिट्टी’ तर कोणाला ‘बासरी’? पाहा अपक्षांच्या चिन्हांची संपूर्ण यादी!

संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली मोठी फसवणूक! १२.५% परताव्याच्या नादात ४४ लाखांचा गंडा
2

संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली मोठी फसवणूक! १२.५% परताव्याच्या नादात ४४ लाखांचा गंडा

Chhatrapati Sambhajinagar Crime: कुठे चालली तरुण पिढी ? एकतर्फी प्रेम, नंतर छळ…, त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: कुठे चालली तरुण पिढी ? एकतर्फी प्रेम, नंतर छळ…, त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

संभाजीनगरकरांना लागला विदेशी श्वानांचा लळा! सुरक्षेसोबतच बनले स्टेटस सिम्बॉल
4

संभाजीनगरकरांना लागला विदेशी श्वानांचा लळा! सुरक्षेसोबतच बनले स्टेटस सिम्बॉल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.