सख्खा भाऊ बनला पक्का वैरी; शेतात पेटवलेल्या कांद्याचा जाब विचारल्याने लोखंडी वस्तूने मारहाण
शिक्रापूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात करंजावणे (ता.शिरुर) येथे शेतातील कांदे जाणूनबुजून पेटवून देऊन नुकसान केल्याचा जाब विचारल्याने सख्ख्या भावानेच भावाला मारहाण केल्याची घटना घडली.
याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात चंद्रकांत हरिभाऊ कुदळे व स्वाती चंद्रकांत कुदळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करंजावणे (ता.शिरुर) येथील रवींद्र कुदळे यांनी त्यांच्या शेतात कांदे लावलेले असताना चंद्रकांत व त्याची पत्नी स्वाती यांनी जाणूनबुजून कांदे पेटवून देत नुकसान केले. त्यांनतर रविंद्र व त्यांची पत्नी शेतात काम करत असतना चंद्रकांत पत्नीसह शेतात आला असता रवींद्र यांनी कांदे पेटवून का दिले? असा जाब विचारला.
तेव्हा चंद्रकात व त्याच्या पत्नीने दोघांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लोखंडी दातळने मारहाण करत जखमी केले. याबाबत रवींद्र हरिभाऊ कुदळे (वय ४० वर्षे रा. करंजावणे ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी चंद्रकांत हरिभाऊ कुदळे व स्वाती चंद्रकांत कुदळे (दोघे रा. करंजावणे ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता याप्रकरणाचा अधिक तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत.
माजी आमदाराच्या कुटुंबावर हल्ला
मिरजगाव शहरातील सिद्धार्थनगर परिसरात गुरुवारी (दि. १) रात्री दिवंगत आमदार विठ्ठलराव भैलुमे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, त्यांचे पती नंदकुमार (नंदकिशोर) भैलुमे आणि मुलगा अजय भैलुमे यांच्यावर कोयता व लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यात कुटुंबीय बचावले, मात्र दोन चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेदेखील वाचा : Palghar Crime: दुर्दैवी ! धावून मिळवला पदक, पण वाचला नाही जीव; शालेय मॅरेथॉननंतर १३ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू






