Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! डोके जमिनीवर आपटून पत्नीची हत्या; जेवण तयार नसल्याने संतापला पती अन् नंतर…

उमाशंकर आणि श्यामवती हे मूळचे बालाघाट जिल्ह्याच्या गर्डरवाडा येथील रहिवासी असून, मजुरीसाठी नागपुरात आले होते. रनाळा परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत दोघेही मजुरी करत होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 18, 2026 | 03:09 PM
खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्...

खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्...

Follow Us
Follow Us:

नागपूर : जेवण तयार नसल्यावरून झालेल्या वादात दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात चुलीची फुंकणी मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर तिचे डोके जमिनीवर आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. श्यामवती उमाशंकर वट्टी (वय ५५, रा. रनाळा) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती उमाशंकर वट्टी (वय ६४) याला पोलिसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, उमाशंकर आणि श्यामवती हे मूळचे बालाघाट जिल्ह्याच्या गर्डरवाडा येथील रहिवासी असून, मजुरीसाठी नागपुरात आले होते. रनाळा परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत दोघेही मजुरी करत होते आणि त्याच ठिकाणी झोपडी उभारून वास्तव्यास होते. त्यांच्यासोबत त्यांचा नातूही राहत होता.

रविवारी रात्री उमाशंकर आणि श्यामवती यांनी एकत्र दारू प्यायली. त्यानंतर उमाशंकर नातवाला घेऊन बाजारात गेला. खरेदी करून दोघे घरी परतले. घरी आल्यानंतर जेवण तयार नसल्याचे पाहून उमाशंकर संतापला. त्याने श्यामवतीसोबत शिवीगाळ करीत वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच वादाचे रूपांतर मारामारीत झाले.

मुलीला फोन करून सांगितला घडलेला प्रकार

उमाशंकरने चुलीची फुंकणी घेऊन श्यामवतीच्या डोक्यात वार केला. एवढ्यावर न थांबता त्याने तिचे डोके जमिनीवर आपटण्यास सुरुवात केली. या मारहाणीत श्यामवतीच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि ती बेशुद्ध पडली. घटनेनंतर उमाशंकरने आपल्या मुलीला फोन करून प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली.

नातवाच्या जबाबावरून घटना उघडकीस

नवीन कामठी पोलिसांनी जखमी श्यामवतीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान नातवाने आपल्या आजोबांनी आजीला मारहाण केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलून उमाशंकरविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली.

नाशिक हादरलं ! नवीन प्रियकराच्या मदतीने पार्टनरचा काढला काटा; मृतदेह कसारा घाटात नेला अन्…

Web Title: Wife murdered by smashing her head against the ground incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त
1

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
2

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
4

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.