Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलीच्या सासरच्यांकडून महिलेला बेदम मारहाण; फावड्याच्या लाकडी दांड्याने तर…

मुलगी पतीसोबत पटत नसल्याने सध्या माहेरी राहते. मात्र, तिचा सात वर्षांचा मुलगा सासरीच म्हणजे वाघमारे यांच्या कुटुंबासोबत राहतो. नातवाला भेटण्यासाठी गेली असताना मारहाण झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 13, 2025 | 08:23 AM
नातवाला भेटायला गेलेल्या महिलेला बेदम मारहाण

नातवाला भेटायला गेलेल्या महिलेला बेदम मारहाण

Follow Us
Follow Us:

धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नातवाला भेटण्यासाठी गेलेल्या एका महिलेला तिच्या मुलीच्या सासरच्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उपाबाई काशिनाथ वाघमारे, धम्मपाल काशिनाथ वाघमारे (वय ३५, दोघे रा. गेट क्रं. ५६, मुकुंदवाडी) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात जिजाबाई रत्नाकर साळवे (वय ५०, रा. बौद्धनगर, जवाहर कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी पतीसोबत पटत नसल्याने सध्या माहेरी राहते. मात्र, तिचा सात वर्षांचा मुलगा सासरीच म्हणजे वाघमारे यांच्या कुटुंबासोबत राहतो.

शनिवारी (दि.८) सकाळी अकराच्या सुमारास जिजाबाई साळवे या आपल्या नातवाला भेटण्यासाठी वाघमारे यांच्या घरी गेल्या होत्या. त्या वेळी मुलीची सासू उषाबाई काशिनाथ वाघमारे हिने ‘तू आमच्या घरी कशाला आलीस?’ असे म्हणत शिवीगाळ केली आणि चप्पल फेकत फिर्यादीच्या तोंडावर हाताने मारहाण केली.

लाकडी दांडक्यानेही केली बेदम मारहाण

याचवेळी तिचा मुलगा धम्मपाल वाघमारे हा देखील तिथे आला. त्याने तुला जिवंत ठेवत नाही, अशी धमकी देत शिवीगाळ केली आणि जवळ पडलेल्या फावड्याच्या लाकडी दांड्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करुन जखमी केले. प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कचरे करीत आहेत.

सिगारेट न दिल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण

हातगाडीवर काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला सिगारेट न दिल्याचा राग आल्याने दोघांनी काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मोरवाडी चौक येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हेदेखील वाचा : धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून विवाहितेचा छळ; माहेरहून तीन लाखांची मागणी केली अन् नंतर…

Web Title: Woman brutally beaten by daughters in laws incident in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 08:23 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar

संबंधित बातम्या

Water Crisis : सातारा-देवळाईकरांचा ठिय्या; ५० पैकी १८ जलकुंभ पूर्ण, वापरात केवळ ४ शहरात तरी टंचाई कायम
1

Water Crisis : सातारा-देवळाईकरांचा ठिय्या; ५० पैकी १८ जलकुंभ पूर्ण, वापरात केवळ ४ शहरात तरी टंचाई कायम

FDA Hits Vaijapur: वैजापूरमध्ये FDAचा दणका! नॅचरल डेअरीचा परवाना निलंबित; पनीर-तुपाचा साठा नष्ट
2

FDA Hits Vaijapur: वैजापूरमध्ये FDAचा दणका! नॅचरल डेअरीचा परवाना निलंबित; पनीर-तुपाचा साठा नष्ट

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात ट्विस्ट! चौकशी बंद करण्यासाठी संस्थाचालकांची धावपळ
3

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात ट्विस्ट! चौकशी बंद करण्यासाठी संस्थाचालकांची धावपळ

Farmers Are Distressed : पाण्याअभावी नाचनवेल-पिशोर परिसरातील पिके सुकली; बळीराजा चिंतातूर आणि आक्रोश
4

Farmers Are Distressed : पाण्याअभावी नाचनवेल-पिशोर परिसरातील पिके सुकली; बळीराजा चिंतातूर आणि आक्रोश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.