Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Wildlife News : सहा तासांची धडपड, अखेर यश! विहिरीत पडलेल्या रानडुकरांची सुखरूप सुटका

Sambhajinagar Wildlife News : छत्रपती संभाजीनगरच्या वांगी परिसरात पाण्याने भरलेल्या खोल विहिरीत पडलेल्या रानडुकरांच्या कळपाला वनविभाग आणि मॅनविथइंडीज फाउंडेशनच्या बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 20, 2026 | 03:49 PM
Forest Department Saves Entire Herd from Deep Well ( वन विभागाने खोल विहिरीतून संपूर्ण कळपाची सुटका केली )

Forest Department Saves Entire Herd from Deep Well ( वन विभागाने खोल विहिरीतून संपूर्ण कळपाची सुटका केली )

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्याला विहिरीत रानडुकरे पाडल्याचे निदर्शनास आले  
  • आवश्यक साहित्य आणि उपकरणांसह घटनास्थळी घेतली धाव  
  • नैसर्गिक अधिवासात केले कळपाला मुक्त 
Sambhajinagar Wildlife News : छत्रपती संभाजीनगर वांगी परिसरात पाण्याने पूर्ण भरलेल्या खोल विहिरीत पडून जीव वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या रानडुकरांच्या कळपाला वनविभाग आणि मॅनविधइंडीज फाउंडेशनच्या वन्यजीव बचाव पथकाने सुखरूप जीवदान दिले. पहाटे ३ वाजता सुरू झालेली बचावमोहीम सकाळी ९ वाजता यशस्वी झाली. तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्व रानडुकरांची कोणतीही जीवितहानी न होता सुटका करण्यात आली.

शेतकऱ्याला विहिरीत रानडुकरे पाडल्याचे निदर्शनास आले

वांगी परिसरातील एका शेतकऱ्याला विहिरीत रानडुकरे पाडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ गावकऱ्यांच्या मदतीने वनविभागाला या घटनेची माहिती दिल्ली, विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रानडुकरांचे संपूर्ण कुटुंब जीव वाचविण्यासाठी संघर्ष करत होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांनी मॅनविथइंडीज फाउंडेशनच्या सुसज्ज वन्यजीव बचाव पथकाशी संपर्क साधून तातडीने बचावकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

Buldhana: दुष्काळाच्या संकटात शासनाचा आधार; बुलढाणा जिल्ह्यात २१५ कोटींचे अनुदान वितरित; ४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदत

आवश्यक साहित्य आणि उपकरणांसह घटनास्थळी घेतली धाव

माहिती मिळताच बचाव पथकाने आवश्यक साहित्य आणि उपकरणांसह घटनास्थळी धाव घेतली. खोल विहीर, पाण्याची पातळी आणि रानडुकरांची सतत सुरू असलेली धडपड यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, योग्य नियोजन, सुरक्षित बचाव तंत्र आणि वनविभाग व बचाव पथकातील समन्वयामुळे एकेक करून सर्व रानडुकरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या बचाव मोहिमेत मॅनविधइंडीज फाउंडेशनचे मनोज गायकवाड, मानद वन्यजीव रक्षक तथा संस्थेचे संचालक आर्किटेक्ट आशिष जोशी, हर्ष केवारे यांच्यासह वनविभागाचे वनरक्षक साईनाथ पवार आणि विलास नरवाडे यांनी संयुक्तपणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देऊन बचावकार्यासाठी सहकार्य करणारे भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विशाल मुरकुटे, सरपंच कोंडीबा शेळके, ग्रामपंचायत सदस्य संतोष दांडगे, लक्ष्मण मुरकुटे, रामू मुरकुटे, विकास मुरकुटे आणि सचिन मुरकुटे यांनीही यावेळी पुढाकार घेतला.

नैसर्गिक अधिवासात केले कळपाला मुक्त

या मोहिमेत रानडुकरांच्या कळपातील एकाही प्राण्याची जीवितहानी झाली नाही. सर्व रानडुकरांची सुरक्षित सुटका करून आवश्यक निरीक्षणानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

Yavatmal Rod Attack: यवतमाळमध्ये खासगी वाहनचालकाची मुजोरी! साईड देण्यावरून बसचालकाला लोखंडी रॉडने केली मारहाण

Web Title: Wild boars rescued from deep well vangi sambhajinagar sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar

संबंधित बातम्या

Sambhajinagar Recruitment News : संभाजीनगर महापालिका भरतीचा निकाल वादात; CCTV तपासणीत ५० उमेदवारांचे बिंग फुटले
1

Sambhajinagar Recruitment News : संभाजीनगर महापालिका भरतीचा निकाल वादात; CCTV तपासणीत ५० उमेदवारांचे बिंग फुटले

Sambhajinagar News : वाळूजला स्वतंत्र नगरपरिषदेचा मार्ग मोकळा? १२ ग्रामपंचायतींच्या एकत्रीकरणाची तयारी सुरू
2

Sambhajinagar News : वाळूजला स्वतंत्र नगरपरिषदेचा मार्ग मोकळा? १२ ग्रामपंचायतींच्या एकत्रीकरणाची तयारी सुरू

Sambhajinagar Statue Work : महापुरुषांच्या पुतळ्यांच्या कामांना गती; महापौर अॅक्शन मोडवर
3

Sambhajinagar Statue Work : महापुरुषांच्या पुतळ्यांच्या कामांना गती; महापौर अॅक्शन मोडवर

National Newborn Week 2026 : नवजात बालकांच्या आरोग्यासाठी विशेष मोहीम! संभाजीनगरात राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहाला सुरुवात
4

National Newborn Week 2026 : नवजात बालकांच्या आरोग्यासाठी विशेष मोहीम! संभाजीनगरात राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहाला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.