Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेने आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् थेट…; शिरोलीत व्यावसायिकासोबत नेमके घडले काय?

पुलाची शिरोलीतील माळवाडी भागातील फारुक येळापुरे त्यांच्याकडे कामाला असलेला अल्लाबक्ष मुल्लाणी याच्या पत्नीने येळापुरे यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2025 | 03:10 PM
महिलेने आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् थेट…; शिरोलीत व्यावसायिकासोबत नेमके घडले काय?
Follow Us
Follow Us:

शिरोली: प्रेमाच्या जाळ्यात ओढून जवळीकता साधल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालत महिलेसह नऊ जणांनी व्यावसायिकास ५८ लाख ५४ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार २०१८ ते मे २०२५ दरम्यान घडला आहे. येळापुरे यांनी दोन महिन्यापूर्वी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात यासंदर्भात लेखी तक्रार दिली होती. मात्र अर्जाची शहानिशा करत पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास दीड महिन्याचा कालावधी घालवला.

शिरोली एमआयडीसी पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याने याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे दाद मागणार असल्याचे संबंधित व्यावसायिकाने शिरोली पोलिसांना सांगितले.  याबाबत व्यावसायिक फारुक महम्मद येळापुरे ( वय ३३, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी संबंधित महिलेसह नऊजणांवर गुन्हा दाखल केला आहे. रोजिना अल्लाबक्ष मुल्लाणी, अल्लाबक्ष कासीम मुल्लाणी ( दोघे रा. शिरोली एमआयडीसी, कोल्हापूर ), मुस्ताक अजीज मुल्ला ( रा. पापाची तिकटी, कोल्हापूर ), दस्तगीर इस्माईल मुजावर, जमीर दस्तगीर मुजावर ( दोघे रा. विशाळगड, ता. शाहूवाडी ), जमाल मौलासाहेब येळापुरे ( रा. शिरोली एमआयडीसी ) यांच्यासह एका स्वयंसेवी संस्थेचा पदाधिकारी भरतकुमार ढंग, एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी अनिल माळवी आणि निवृत्त पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब कोकितकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्याद देऊन दोन महिने झाले. मात्र अद्याप संबंधितांवर समाधानकारक कारवाई झाली नसल्याने येळापुरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत दाद मागितल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुलाची शिरोलीतील माळवाडी भागातील फारुक येळापुरे त्यांच्याकडे कामाला असलेला अल्लाबक्ष मुल्लाणी याच्या पत्नीने येळापुरे यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. मोबाइलमध्ये दोघांचे फोटो आणि व्हिडीओ काढले. हे फोटो नातेवाइकांना दाखवून बदनामी करू अशी भीती घालत रोख रक्कम उकळण्यास सुरुवात केली.

हा प्रकार तिचा पती, वडील आणि इतर नातेवाइकांना समजला. त्यांनीही पोलिसांत तक्रार देण्याची भीती घालून पैसे उकळले. सात वर्षांत तब्बल ५८ लाख ५४ हजार रुपये घेऊन ही त्यांची पैशाची मागणी संपली नव्हती. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने येळापुरे यांनी अखेर पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले होते. यापैकी तिघांची जामीनावर सुटका झाली आहे.

या गुन्ह्यातील महिलेसह मुस्ताक मुल्ला आणि दस्तगीर मुजावर यांना जामीन मंजूर झाला आहे. इतरांना अद्याप अटक झालेली नाही. संशयित आरोपी गावात फिरत असूनही शिरोली पोलिसांकडून त्यांना अटक झालेली नाही. त्यामुळे पोलिस अधीक्षकांकडे आपण न्याय मागणार असल्याचे येळापुरे यांनी  तपास अधिकाऱ्यांना सांगितले.

Web Title: Woman with nine accused fraud with businessmen worth rs 58 lakhs shiroli crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • Shiroli

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.