Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal Crime: महामंडळावर पद देण्याचे आमिष; 20.25 कोटींची डील ठरवणारी ठगबाज टोळी जेरबंद

यवतमाळमध्ये महामंडळांवर अध्यक्ष किंवा सदस्यपद मिळवून देण्याचे आमिष दाखवत 20.25 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या ठगबाज टोळीचा पर्दाफाश झाला आहे. भाजप समन्वयक नितीन भुतडा यांच्या सतर्कतेमुळे आणि स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने पुरावे गोळा करून पोलिसांनी सापळा रचला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 01, 2026 | 03:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • महामंडळातील नियुक्त्यांचे आमिष दाखवून 20.25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.
  • भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी स्पाय कॅमेऱ्याद्वारे पुरावे गोळा केले.
  • पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे.
यवतमाळ: महामंडळांवर अध्यक्ष किंवा सदस्यपन मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल २०.२५ कोटींची मागणी करणाऱ्या ठगबाज टोळीचा यवतमाळमध्ये पर्दाफाश झाला दिल्लीमधील बड्या नेत्यांशी थेट संबंध आहेत, असा दावा करत केंद्रीय महामंडळांवर नियुक्त्यांचे स्वप्न दाखविणाऱ्या या टोळीचा भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या सतर्कतेमुळे डाव फसला. त्यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. प्रकरणी ३ जणांना पोलिसांनी अटक केली. भुतडा यांनी पोलिसांच्या मदतीने स्पाय कॅमेराद्वारे ठगबाजांना ट्रैप केल्याने तो व्हिडीओ आणि

Chandrapur Crime: व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याचा राग; ‘सरप्राइज गिफ्ट’च्या बहाण्याने प्रेयसीचा गळा चिरून खून

पुरावेही पोलिस तपासासाठी देण्यात आल्याची माहिती आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ४२ महामंडळांची अधिकृत भासणारी यादी पाठवून या टोळीने यवतमाळ जिल्ह्यात काही राजकीय लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. सोबतच इच्छित महामंडळ निवडा आणि नियुक्ती निश्चित समजा, असा दावा करत आरोपींनी २०.२५ कोटी रुपयांचा डील करण्याचा प्रस्ताव भुतडा यांच्यासमोर ठेवला होता, अशी माहिती समोर आली आहे.

स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने संभाषण आणि पुरावे गोळा या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान भुतडा है स्वतः राजकीय क्षेत्राशी आणि भाजप नेत्यांच्या संपर्कात राहत असल्याने त्यांना सुरुवातीपासूनच या व्यवहाराबाबत संशय होता. त्यामुळे त्यांनी सावध पवित्रा घेतला. त्यांनी स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने आरोपींचे संभाषण आणि हालचालींचे पुरावे गोळा केले. यानंतर शनिवारी फसवणुकीत सहभागी असलेल्या लोकांचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अवधूतवाडी पोलिसांची मदत घेत सापळा रचण्यात आला. त्यानुसार या टोळीचा भंडाफोड करण्यात आला. राजकीय नियुक्त्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आली.

अशी आहेत ‘त्या’ आरोपींची नावे
या कारवाईत पोलिसानी लौकिक जगन्नाथ फुलकर, विश्वजित सुरेश राठोड आणि गणेश लालसिंग राठौड या तिघांना अटक केली. भुतडा यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले, पोलिस निरीक्षक नंदकुमार काळे आणि पथकाद्वारे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

व्हॉट्‌सअॅपद्वारे साधला नेत्याशी संपर्क
प्रकरणाची सुरुवात १६ मे रोजी झाली. यात आरोपी लौकिक जगन्नाथ फुलकर याने व्हॉट्सअॅपद्वारे भाजप समन्वयक भुतडा यांच्यासोबत संपर्क साधला होता. यानंतर दिल्ली कनेक्शन दाखवून गणेश लालसिंग राठोड याला पुढे सेटिंगसाठी मुख्य सूत्रधार म्हणून समोर करण्यात आले. आरोपींनी भुतडा यांना विविध महामंडळांची यादी देऊन त्यात कोणतेही ३ महामंडळ निवडण्यास सांगितले होते. यात नियुक्तीच्या बदल्यात २०.२५ कोटींची मागणी करण्यात आली, व्यवहार पक्का करण्यासाठी एकूण रकमेपैकी ५ टक्के रक्कम टोकन म्हणून आगाऊ देण्याची अटही घालण्यात आली. थेट राजधानीतून नियुक्तीबाबत फोन येईल, असे आमिष दाखविण्यात आले.

Khoda Surya Murder Case : सूर्या हत्याकांड प्रकरण तापलं; आरोपी असदच्या घरावर बुलडोजर चालणार? प्रशासनाची नोटीस

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी लोकांना कोणते आमिष दाखवत होते?

    Ans: केंद्र सरकारच्या महामंडळांवर अध्यक्ष किंवा सदस्यपद मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते.

  • Que: या प्रकरणाचा भंडाफोड कसा झाला?

    Ans: नितीन भुतडा यांनी संशय आल्याने स्पाय कॅमेऱ्याद्वारे पुरावे गोळा केले आणि पोलिसांच्या मदतीने सापळा रचला.

  • Que: पोलिसांनी किती आरोपींना अटक केली?

    Ans: लौकिक फुलकर, विश्वजित राठोड आणि गणेश राठोड या तिघांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Yavatmal crime lured with a post in a corporation gang of swindlers behind 2025 crore deal busted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • crime
  • Yavatmal
  • Yavatmal Crime

संबंधित बातम्या

Chandrapur Crime: व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याचा राग; ‘सरप्राइज गिफ्ट’च्या बहाण्याने प्रेयसीचा गळा चिरून खून
1

Chandrapur Crime: व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याचा राग; ‘सरप्राइज गिफ्ट’च्या बहाण्याने प्रेयसीचा गळा चिरून खून

Khoda Surya Murder Case : सूर्या हत्याकांड प्रकरण तापलं; आरोपी असदच्या घरावर बुलडोजर चालणार? प्रशासनाची नोटीस
2

Khoda Surya Murder Case : सूर्या हत्याकांड प्रकरण तापलं; आरोपी असदच्या घरावर बुलडोजर चालणार? प्रशासनाची नोटीस

Chhattisgarh Crime: 70 वर्षीय वडिलांची काठीने ठेचून निर्घृण हत्या, घरात लपवला मृतदेह; छत्तीसगढ येथील घटना
3

Chhattisgarh Crime: 70 वर्षीय वडिलांची काठीने ठेचून निर्घृण हत्या, घरात लपवला मृतदेह; छत्तीसगढ येथील घटना

Nashik: मध्यरात्री आलिशान गाड्यांतून आले अन् स्मशानभूमीत केली अघोरी विधी; अर्धनग्न मांत्रिक, अंडी, लिंबू,आणि…
4

Nashik: मध्यरात्री आलिशान गाड्यांतून आले अन् स्मशानभूमीत केली अघोरी विधी; अर्धनग्न मांत्रिक, अंडी, लिंबू,आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.