nanded (फोटो सौजन्य : social media)
कर्जबाजारीपणा, नापिकी आणि कुटुंबावरची जबाबदारी या सगळ्यांचा मानसिक ताण झेलताना एका तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं. या धक्कादायक घटनेचा परिणाम इतका गंभीर ठरला की त्याच्या वडिलांचा काही दिवसांतच मृत्यू झाला आणि आईलाही हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. एकाच कुटुंबावर आलेल्या या दुहेरी आघातामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, ही घटना शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीचं विदारक दर्शन घडवणारी ठरली आहे.
हि घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्याचे सावरगाव नसरत येथे घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव राहुल भीमराव बेदरे आहे (वय २७) असे आहे. राहुलचे वडील म्हणजेच भीमराव बेदरे यांना साडेतीन एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीवर भारतीय स्टेट बँकेचे कर्ज आहे. त्यातच बेदरे यांना आजाराने ग्रासल्याने ते अंथरुणाला खिळले होते. अशा वेळी राहुल शेती आणि मिळेल ते मजुरीचं काम करत कुटुंबाचा गाडा ओढत होता. मात्र, सावरगाव परिसरातील कोरडवाहू शेती, पावसावर अवलंबून असलेला शेतीचा हंगाम, सततची नापिकी आणि शेतीवरील कर्ज या सगळ्यांनी राहुलला मानसिकदृष्ट्या खचवलं. याच नैराश्यातून त्याने १० जून रोजी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या तरुण मुलाच्या मृत्युच्या धक्याने वडिलांचाही दोन दिवसांत म्हणजेच 12 जून रोजी मृत्यू झाला. कुटुंबावर कोसलळेलं हे संकट आईच्याही काळजाचा ठोका चुकवणारं होतं. मुलगा आणि पतीच्या मृत्युच्या घटनेनंतर आई शोभाबाई यांना हृदयविकाराचा झटका आला. सुदैवाने सध्या त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे, पण घरात दु:खाचा डोंगर असताना त्याही रुग्णालयात मृ्त्युशी झुंज देत होत्या.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी पीडित कुटुंबीयांना आधार देत पुढाकार घेतला आहे. मात्र, ग्रामस्थ करुन करुन काय करणार आहेत. आता तात्काळ आर्थिक मदत करावी, तसेच या भागात सिंचनाच्या सोयीसाठी धोंड प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरु करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
तांब्याच्या तारा चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या; लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून पकडले