Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रेकअप झाल्याने फार्मसीची विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन

आस्था ही तुळशीराम गायकवाड पाटील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे चंदन पोंगळे यांच्या घरी भाड्याने राहत होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 11, 2026 | 10:27 AM
रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

Follow Us
Follow Us:

बुटीबोरी : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच आता चंद्रपुरातील एका तरुणीने ब्रेकअप झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे ही घटना घडली.

आस्था कुंदन नगराळे (वय २१, रा. शास्त्रीनगर, भद्रावती, जि. चंद्रपूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. आस्था ही तुळशीराम गायकवाड पाटील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे चंदन पोंगळे यांच्या घरी भाड्याने राहत होती. ८ एप्रिलला रात्री १०.३० च्या सुमारास ती घरच्यांचे फोन उचलत नसल्याने आईने नागपूरला असलेल्या नातेवाईकांना कळवले. तिचे चुलत भाऊ प्रणय नगराळे यांनी तातडीने सातगाव गाठले असता आस्थाने रूममधील सीलिंग फॅनला दुपट्ट्याने गळफास घेतल्याचे दृश्य समोर आले.

आस्थाने यापूर्वी दोनवेळा ‘नीट’ परीक्षेसाठी ‘ड्रॉप’ घेतला होता. मात्र, अपेक्षित यश मिळत नसल्याने ती सतत चिडचिड करत असे आणि मानसिक तणावात राहत होती. त्यातच तन्मय बोरीकर नावाच्या तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधात काही काळापासून दुरावा निर्माण झाला होता. शैक्षणिक अपयश आणि प्रेमभंगाचे दुःख अशा दुहेरी संकटात सापडलेल्या आस्थाने अखेर टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

सुसाईड नोटमध्ये काय?

पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी आस्थाने लिहिलेली ‘सुसाईड नोट’ सापडली. इंग्रजीत लिहिलेल्या चिठ्ठीत तिने नमूद केले की, ‘मी माझ्या इच्छेने हे पाऊल उचलत आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही दोषी ठरवू नये’ जरी तिने कोणाला जबाबदार धरले नसले तरी, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष समोर येत आहे.

तरुणीच्या भावाची पोलिसांत तक्रार

याप्रकरणी मृत मुलीचा भाऊ प्रणय राजेश नगराळे (रा. नोएडा) यांच्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. ‘माझा कोणावरही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संशय नाही’ असे त्यांनी जबाबात म्हटले आहे. तपासासाठी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे.

तरुणांमध्ये वाढते मानसिक नैराश्य

तरुणांमध्ये वाढते मानसिक नैराश्य आणि आत्महत्येचे विचार ही एक गंभीर सामाजिक समस्या बनत आहे. शैक्षणिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे तणाव जाणवल्यास त्वरित समुपदेशकाची किंवा मदतीसाठी उपलब्ध असलेल्या हेल्पलाईनची मदत घेणे आवश्यक आहे.

– नीलेश चौरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बुटीबोरी पोलिस स्टेशन

Web Title: Young girl commits suicide due to depression following breakup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • crime news
  • suicide news

संबंधित बातम्या

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
1

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
2

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
3

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
4

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.