Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इसको अब खत्म कर देंगे…’ म्हणत सिमेंटच्या गट्टूने तरुणावर जीवघेणा हल्ला; पूर्ववैमनस्यातून रात्री गाठलं अन्…

"इसको अब खत्म कर देंगे" असे म्हणत रस्त्याकडेला पडलेला सिमेंटचा गट्टू फिर्यादीच्या चेहऱ्यावर जोराने मारला. यामध्ये फिर्यादीच्या नाकाला गंभीर दुखापत झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 16, 2026 | 12:08 PM
'इसको अब खत्म कर देंगे...' म्हणत सिमेंटच्या गट्टूने तरुणावर जीवघेणा हल्ला; पूर्ववैमनस्यातून रात्री गाठलं अन्...

'इसको अब खत्म कर देंगे...' म्हणत सिमेंटच्या गट्टूने तरुणावर जीवघेणा हल्ला; पूर्ववैमनस्यातून रात्री गाठलं अन्...

Follow Us
Follow Us:

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असतानाच आता नेहरुनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर आणि त्याच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि.१४) रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास नेहरुनगर येथील पवार पेट्रोल पंपाशेजारील बालाजी ट्रेडर्ससमोर घडली.

याप्रकरणी दानिश आरिफ शेख (वय १८, नेहरुनगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शहाबाज उर्फ टिपू शहा (वय ३०, नेहरुनगर, पिंपरी), इर्रशाद शहा (वय ३२, भोसरी), सूरज उर्फ आसिफ शेख (वय २१, नेहरुनगर, पिंपरी) आणि रामा दुर्गाअप्पा चौधरी (वय २५, नेहरुनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या दाजींना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांच्या अंगावर धावून जात त्यांना मारहाण केली. यावेळी एका आरोपीने फिर्यादीला पकडून धरले, तर दुसऱ्याने “इसको अब खत्म कर देंगे” असे म्हणत रस्त्याकडेला पडलेला सिमेंटचा गट्टू फिर्यादीच्या चेहऱ्यावर जोराने मारला. यामध्ये फिर्यादीच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सूरज आणि रामा या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

कोयत्याने तरूणावर हल्ला

दुसऱ्या एका घटनेत, पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. निगडी येथील पीसीएमसी कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाजवळ जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (११ एप्रिल) रोजी पहाटे ४:५० च्या सुमारास ही घटना घडली आहे.

कोयत्याने टोलनाक्याची तोडफोड

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाटस येथील टोलनाक्यावर चार-पाच जणांच्या टोळीने कोयत्यांनी टोल नाक्याची तोडफोड करत हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक टोल कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाटस पोलिसांनी तीन जणांना पाठलाग करून ताब्यात घेतले असून, दोन जण फरार झाले आहेत.

पाटसमधील टोलनाक्यावर कोयता गॅंगची दहशत; तीन जणांना पाठलाग करून पकडले

Web Title: Young man subjected to life threatening attack due to old enmity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • crime news
  • Pimpri Crime
  • pune news

संबंधित बातम्या

माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे; बिनविरोध निवड, सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार
1

माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नितीन शेंडे; बिनविरोध निवड, सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार

Buldhana News: मजुरीच्या पैशावरून चाकूने प्राणघातक हल्ला; पिंपळगाव काळे येथे पेटला होता वाद
2

Buldhana News: मजुरीच्या पैशावरून चाकूने प्राणघातक हल्ला; पिंपळगाव काळे येथे पेटला होता वाद

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई
3

सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई

पुणे विद्यापीठातील प्राध्यापक पदासाठी एक कोटी रुपयांचा ‘रेट’ सुरू; आमदार रोहित पवारांचा दावा
4

पुणे विद्यापीठातील प्राध्यापक पदासाठी एक कोटी रुपयांचा ‘रेट’ सुरू; आमदार रोहित पवारांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.